वहिनीने लग्नास नकार दिल्याच्या रागात कुटुंबीयावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:11 AM2021-08-17T04:11:49+5:302021-08-17T04:11:49+5:30

घाटकोपरमधील घटना, दिराविरुद्ध गुन्हा दाखल घाटकोपरमधील घटना, दिराविरुद्ध गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चुलत भाऊ कामानिमित्त दुबईत ...

Fatal attack on family in anger over daughter-in-law's refusal to marry | वहिनीने लग्नास नकार दिल्याच्या रागात कुटुंबीयावर जीवघेणा हल्ला

वहिनीने लग्नास नकार दिल्याच्या रागात कुटुंबीयावर जीवघेणा हल्ला

Next

घाटकोपरमधील घटना, दिराविरुद्ध गुन्हा दाखल

घाटकोपरमधील घटना, दिराविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चुलत भाऊ कामानिमित्त दुबईत असल्याने घरात असलेल्या वहिनीला दिरानेच लग्नासाठी गळ घातली. वहिनीने नकार देताच, रागात कुटुंबीयांवर चाक़ूने हल्ला चढविला. त्याची बहिण, भाऊ आणि आई जखमी झाली आहे. घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या ३० वर्षीय बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, चुलत भाऊ कामानिमित्त दुबईत असतो. त्यांची पत्नी सोबत राहण्यास असते. भावाने वहिनीकड़े लग्नासाठी तगादा लावला. वहिनीने नकार दिला. याच रागात त्याने कुटुंबीयांना शिवीगाळ सुरू केली.

शनिवारी बहिणीकडून घरी आल्यानंतर भावाने पुन्हा शिवीगाळ सुरू केली. जवळील चाक़ूने हल्ला चढविला. आईलाही मारले. जीव वाचविण्यासाठी बहिणीने त्याच्या डोक्यात पाण्याचा मटका मारला. नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहून त्याने पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस तेथे दाखल झाले. जखमींना राजावाड़ी रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Fatal attack on family in anger over daughter-in-law's refusal to marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.