समाजसेविकेवर प्राणघातक हल्ला

By admin | Published: October 4, 2015 02:38 AM2015-10-04T02:38:39+5:302015-10-04T02:38:39+5:30

मुलीच्या अंगावर थुंकणाऱ्या व्यक्तीकडे जाब विचारला म्हणून महिला समाजसेविकेसह तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना भायखळा येथे शुक्रवारी रात्री घडली.

Fatal attack on social workers | समाजसेविकेवर प्राणघातक हल्ला

समाजसेविकेवर प्राणघातक हल्ला

Next

मुंबई : मुलीच्या अंगावर थुंकणाऱ्या व्यक्तीकडे जाब विचारला म्हणून महिला समाजसेविकेसह तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना भायखळा येथे शुक्रवारी रात्री घडली. माझगाव येथील रहिवासी असलेल्या समाजसेविका सलमा अस्लम नाईक (४४) यांच्यासह त्यांची १५वर्षीय मुलगी आणि पती या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास माझगाव परिसरात नाईक या मुलीसोबत फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी एक तरुण मुलीच्या अंगावर थुंकला. याचा जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली.

Web Title: Fatal attack on social workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.