Join us  

एफ उत्तरमध्ये सेना, भाजपाला अनपेक्षित धक्का

By admin | Published: February 25, 2017 3:48 AM

अ‍ॅण्टॉप हिल, सायन कोळीवाडा, वडाळा अशा ११ प्रभाग असलेल्या एफ उत्तर विभागात शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने आपापल्या जागा राखल्या आहेत़ या मतदारसंघातील भाजपाचे

मुंबई : अ‍ॅण्टॉप हिल, सायन कोळीवाडा, वडाळा अशा ११ प्रभाग असलेल्या एफ उत्तर विभागात शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसने आपापल्या जागा राखल्या आहेत़ या मतदारसंघातील भाजपाचे आमदार तमील सेल्वन यांना स्वगृहातच पराभवाचा सामना करावा लागला आहे़ सभागृह नेत्या व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांचा अनपेक्षित पराभव शिवसेनेसाठी मोठा झटका ठरला आहे़एफ उत्तर आणि एफ दक्षिण प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने या प्रभाग समितीवरही शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येत होता़ शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांनाही अ‍ॅण्टॉप हिल प्रभागात २०१२मध्ये उमेदवारी देऊन निसटता विजय मिळवला होता़ विधानसभा निवडणुकीत भाजपाची ताकद येथे वाढली़ नगरसेवक तमिल सेल्वन यांनी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शेट्टी यांचा पराभव करीत भाजपाचे पारडे जड केले़ याचे बक्षीस म्हणून त्यांचे बंधू मुरगन सेल्वन यांना महापालिकेचे तिकीट मिळाले़ या प्रभागात भाजपाच्या जागा वाढवून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती़ त्यानुसार तीन जागांवर भाजपाचे उमेदवार येथे जिंकून आले़ मात्र मुरगन यांना पराभवाचा सामना करावा लागला़ त्यांना उमेदवारी मिळालेल्या प्रभाग १७६मध्ये काँग्रेसने ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी राजा यांना उतरविले होते़ युती तुटल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मतांची विभागणी झाली़ याचा धक्का मुरगन यांना बसला़ कहीं खुशी..़ कहीं गमप्रभाग १७८मध्ये शिवसेनेने विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी आंदोलन केले होते़ पक्षश्रेष्ठींनी आवाज देताच हा विरोध मावळला तरी शिवसेनेला धाकधूक होती़ या प्रभागात पहिल्या फेरीपासूनच भाजपा आघाडीवर होती़ शेवटच्या क्षणी अमेय घोले यांना नशिबाची व मतांची साथ मिळाली़ ते विजयी झाले़ प्रभाग क्ऱ १७९ येथून निवडणूक लढविणाऱ्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना पराभवाचा सामना करावा लागला़ काँग्रेसचे सुफियाना वनू यांनी अवघे १२६ मताधिक्य मिळवत विश्वासराव यांना पराभूत केले़ विधानसभा निवडणुकीत सेल्वन यांना पराभूत केल्यानंतर पालिका निवडणुकीत उतरलेले शिवसेनेचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांनी विद्यमान नगरसेविका काँग्रेसच्या ललिता यादव यांचा प्रभाग १७५मध्ये पराभव केला़ (प्रतिनिधी)