Join us

राज्यभरात पावसाचे थैमान, आमदाराच्या कुटुंबातील पिता-पुत्र गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 7:59 AM

दापोलीत तीन तासांत तब्बल ३१५ मिमी, विदर्भ-मराठवाड्यात ९ बळी

ठळक मुद्देमराठवाड्यात सोयाबीन, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोमवारी रात्रीपासून राज्यातील अनेक भागात कोसळणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला तर तब्बल तीन तास ढगफुटीसदृश धारा कोसळल्या. मराठवाड्यात ३ तर विदर्भात सहा असे एकूण ९ जण वाहून गेले. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून सोयाबीन, कपाशी तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे.

दापोलीच्या इतिहासात प्रथमच शहरात पूर आला. तब्बल ३१५ मिलीमीटर पाऊस पडल्याने ७० गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. मध्यरात्रीपर्यंत शहरातील रस्त्यांवर ३ ते ४ फूट पाणी झाले. समुद्राला उधाणाची भरती आली होती. नेमका त्याचवेळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे खाड्यांमधून पाण्याचा निचरा होण्याऐवजी पाणी उलट मागे फिरल्याने ही स्थिती उद्भवली.रायगडच्या मुरूड तालुक्यात ४७५ मिमी पाऊस झाला. रात्रभर बरसणाऱ्या पावसामुळे २५ गावांतील घरांमध्ये पाणी शिरले. मच्छीमार बोटींसह रस्ते खचून काही पूलही वाहून गेले आहेत.

विदर्भात ६ जणांचा मृत्यूnविदर्भात मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने सहा जणांचा बळी घेतला. सोयाबीन, कपाशीसह पिकांचे मोठे नुकसान झाले.nयवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यात अतिवृष्टीची झाली. यवतमाळ जिल्ह्यात तिघे, तर चांदूर रेल्वे तालुक्यात एक जण वाहून गेला.nचंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस आहे. नागपुरात अर्ध्या तास पावसाने रस्ते जलमय झाले.nअकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांत पावसाने कहर केला.मराठवाड्यात तीन बळीnमराठवाड्यात सोयाबीन, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे. nबीड तालुक्यातील कपिलधार येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन तरूण पाण्यात वाहून गेले. यातील एकाला वाचविण्यात यश आले.

आमदाराच्या कुटुंबातील पिता-पुत्र गेले वाहूनमुखेड शहराजवळ मोती नाल्यात कार वाहून गेल्याने आमदार डॉ. तुषार राठोड यांचे चुलतभाऊ भगवान राठोड आणि त्यांचा मुलगा संदीप राठोड हे दोघे पुरात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. चालक उद्धव देवकत्ते यांनी झाडाचा आसरा घेत स्वतःचे प्राण वाचविले. दुसऱ्या अन्य दोन घटनांत दोघांचे मृतदेह सापडले.

खान्देशात सर्वत्र हजेरीजळगाव जिल्ह्यात सर्वाधिक, त्याखालोखाल धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम हजेरी लावली. जळगावातील वाघूर व तापीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

टॅग्स :पाऊस