जन्मदात्या पित्याला मुलीने केले यकृतदान, वडिलांना मिळाले नवे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:15 AM2017-11-21T06:15:06+5:302017-11-21T06:17:04+5:30

मुंबई : जन्मदात्या पित्याला मुलीने यकृताचे दान केल्याने त्यांना नवे जीवन मिळाले आहे.

The father of the father-in-law has given birth to the father, the new life he received from his father | जन्मदात्या पित्याला मुलीने केले यकृतदान, वडिलांना मिळाले नवे जीवन

जन्मदात्या पित्याला मुलीने केले यकृतदान, वडिलांना मिळाले नवे जीवन

Next

मुंबई : जन्मदात्या पित्याला मुलीने यकृताचे दान केल्याने त्यांना नवे जीवन मिळाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. दोघांनाही रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.
नवी मुंबईचे रहिवासी श्रीराम बीजार्निया (५५) यांना डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला
दिला होता. जिल्हा प्रत्यारोपण समितीकडे नाव नोंदणीनंतर बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची २३ वर्षांची मुलगी पूजा
हिने त्यांना यकृतदान
करण्याचा निर्णय घेतला. योग्य दाता मिळण्यासाठी बीजार्निया कुटुंबातील चार मुली, तसेच पत्नीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगी पूजा हीच योग्य दाता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, लिव्हर ट्रान्सप्लान्टेशनचे प्रमुख डॉ. दारीयस एफ मिर्झा आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. विक्रम राऊत यांनी यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया केली.

Web Title: The father of the father-in-law has given birth to the father, the new life he received from his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई