Join us

जन्मदात्या पित्याला मुलीने केले यकृतदान, वडिलांना मिळाले नवे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 6:15 AM

मुंबई : जन्मदात्या पित्याला मुलीने यकृताचे दान केल्याने त्यांना नवे जीवन मिळाले आहे.

मुंबई : जन्मदात्या पित्याला मुलीने यकृताचे दान केल्याने त्यांना नवे जीवन मिळाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. दोघांनाही रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.नवी मुंबईचे रहिवासी श्रीराम बीजार्निया (५५) यांना डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्लादिला होता. जिल्हा प्रत्यारोपण समितीकडे नाव नोंदणीनंतर बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची २३ वर्षांची मुलगी पूजाहिने त्यांना यकृतदानकरण्याचा निर्णय घेतला. योग्य दाता मिळण्यासाठी बीजार्निया कुटुंबातील चार मुली, तसेच पत्नीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगी पूजा हीच योग्य दाता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, लिव्हर ट्रान्सप्लान्टेशनचे प्रमुख डॉ. दारीयस एफ मिर्झा आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. विक्रम राऊत यांनी यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया केली.

टॅग्स :मुंबई