Join us

वडिलांनीच केली मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

माहीम येथील घटनावडिलांनीच केली मुलाची हत्यामाहीम येथील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रेमविवाहाला असलेला विरोध, त्यात ...

माहीम येथील घटना

वडिलांनीच केली मुलाची हत्या

माहीम येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रेमविवाहाला असलेला विरोध, त्यात मालमत्तेत हिस्सा मागणाऱ्या मुलाची वडिलांनीच हत्या केल्याची घटना माहीम येथे शनिवारी घडली. या प्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येच्या गुह्यात वडील सिराजउद्दीन खान यांना अटक केली आहे. ते टेलर म्हणून काम करतात.

माहीम येथील गायवाडी चाळ परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यात, सैफ सिराजउद्दीन खान (२८) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सैफने घरच्यांच्या विरोधात जात प्रेमविवाह केल्यामुळे वडील नाराज होते. त्यात, शनिवारी तो त्याची कागदपत्रे घेण्यास आला. तसेच या वेळी त्याने मालमत्तेत हिस्सा देण्याचीही मागणी केली. मात्र वडिलांनी याला विरोध केला. यातच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि वडिलांनी त्याला मारहाण करत खाली ढकलले. यातच डोक्याला जबर मार बसल्यामुळे तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेताच त्याला मृत घोषित करण्यात आले. यात सैफ याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून माहीम पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली.