प्रशासकामुळे वडील १६ ते १८ महिन्यापासून होते तणावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:17+5:302021-03-10T04:07:17+5:30
मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप डेलकर कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट प्रशासकामुळे वडील १६ ते १८ महिन्यांपासून होते तणावात ...
मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप
डेलकर कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
प्रशासकामुळे वडील १६ ते १८ महिन्यांपासून होते तणावात
मोहन डेलकर यांच्या मुलाचा आरोप; डेलकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी केला. मंगळवाऱी याबाबत अभिनव आणि त्याच्या आईने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.
मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ग्रीन साउथ हॉटेलमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करीत कुलाबा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत. मंगळवारी डेलकर यांचा मुलगा अभिनव आणि आईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी अभिनव याने माध्यमांना सांगितले की, ‘दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली. वडील सात वेळा खासदार होते. असे असतानाही ती व्यक्ती आत्महत्या करते, म्हणजे त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला जात होता हे समजते. सुसाईड नोटमध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला जात होता. विनाकारण खोट्या प्रकरणांत अडकविणे, आरोप करणे तसेच धमक्यांबरोबर काहीजणांकड़ून खंडणीची मागणी करण्यात आली होती.
केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे प्रशासकाच्या हातात सर्व कारभार असतो. याचाच फायदा घेत वडिलांना पाडण्याचा प्रयत्न केला. हा त्रास आताचा नसून गेल्या १६ ते १८ महिन्यांपासूनचा आहे. गुजरातच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस न्याय मिळवून देतील, ही आशा असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. याबाबत लेखी पत्र त्यांना दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे, असे अभिनवने सांगितले.
......................