थकवा, झोप येऊनही ५०% चालक चालवितात ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 04:54 AM2020-03-01T04:54:30+5:302020-03-01T04:54:35+5:30

थकवा आणि झोप आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून ५० टक्के चालक ट्रक चालवितात.

Fatigue, sleepiness and 5% of drivers drive trucks | थकवा, झोप येऊनही ५०% चालक चालवितात ट्रक

थकवा, झोप येऊनही ५०% चालक चालवितात ट्रक

googlenewsNext

मुंबई : थकवा आणि झोप आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून ५० टक्के चालक ट्रक चालवितात. यामुळे अपघात घडतात, अशी माहिती सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
सेव्ह लाइफ फाउंडेशनने दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, कानपूर, विजयवाडा, गुवाहाटी अशा दहा शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये १२०० ट्रकचालकांचा अभ्यास करण्यात आला आहे. याबाबत केंद्र्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री व्ही. के. सिंग म्हणाले की, ट्रकचालक आणि रस्ता वापरकर्ते या दोघांबाबत रस्ते सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या मुद्द्यांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. तर सेव्ह लाइफचे संस्थापक पीयूष तिवारी म्हणाले की, मुंबईत गेल्या दहा वर्षांत ८४ टक्के चालकांच्या जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. ९८ टक्के वाहनचालक त्यांच्या कामाशी समाधानी नाहीत. ६४ टक्के चालकांना मान,अंगदुखीचा सामना करावा लागत आहे. ५४ टक्के जणांना डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास आहे. ४५ टक्के जण वाहतूक करताना लाच देतात, तर ९५ टक्के चालकांना मालकांकडून भत्ता मिळत नाही.
>४७,८५२ कोटींची लाच
देशात रस्ते वाहतूक करताना ट्रकचालक दरवर्षी ४७,८५२ कोटी रुपयांची लाच देतात. तर पाचपैकी एक ट्रकचालक वाहन चालविताना अमली पदार्थाचे सेवन करतात, असेही या अहवालातून समोर आले आहे.

Web Title: Fatigue, sleepiness and 5% of drivers drive trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.