ट्राय अँपच्या माध्यमातून मनपसंत वाहिन्यांची निवड करणे शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 07:06 PM2020-07-03T19:06:20+5:302020-07-03T19:07:05+5:30

ग्राहकांना आपल्या आवडीच्या मनपसंत वाहिन्या निवड करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राई)  तर्फे टीव्ही चँनेल सिलेक्टर अँप तयार केले

Favorite channels can be selected through Troy Amp | ट्राय अँपच्या माध्यमातून मनपसंत वाहिन्यांची निवड करणे शक्य 

ट्राय अँपच्या माध्यमातून मनपसंत वाहिन्यांची निवड करणे शक्य 

googlenewsNext

 

मुंबई : ग्राहकांना आपल्या आवडीच्या मनपसंत वाहिन्या निवड करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राई)  तर्फे टीव्ही चँनेल सिलेक्टर अँप तयार केले असून या माध्यमातून ग्राहकांना केबल, डीटीएच प्लँन साठी वाहिन्या निवडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या अँपला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.  या अँपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या प्लँनमधून नावडत्या वाहिन्या हटवू शकतात व आवडीच्या वाहिन्यांची निवड करु शकतात. 

आतापर्यंत वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय केबल ऑपरेटर च्या माध्यमातून देण्यात आला होता. त्यामुळे अनेकदा ग्राहकांना त्यांच्या आवडीऐवजी केबल ऑपरेटरच्या आवडीप्रमाणे वाहिन्या पाहाव्या लागत असत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.  अनेकदा ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वाहिन्या निवडण्यामध्ये विविध अडचणी येत असत त्याबाबत ट्राई कडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.  त्यामुळे ग्राहकांना वाहिन्यांच्या निवडीचा पर्याय उपलब्ध होण्यासाठी ट्राई ने हे अँप तयार केले आहे. या अँपला डीटीएच व केबल ऑपरेटर शी जोडण्यात आले आहे. सध्या हे अँप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. 

मोठ्या डीटीएच सेवा पुरवठादार,मल्टी सिस्टम ऑपरेटर्स (एमएसओ/केबल ऑपरेटर) यांची या अँपवर सध्या माहिती देण्यात आली असून टप्प्याटप्याने इतर माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. ग्राहकांना यामुळे पारदर्शक पध्दतीने व्यवहार करणे शक्य होईल.  ग्राहकांना वाहिन्यांची निवड करताना वन टाईम पासवर्ड (ओटीपी) त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल व त्यानंतर त्यांना निवड करता येईल.  ज्या ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदणी केलेला नसेल त्यांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर ओटीपी दिसेल. 

 

Web Title: Favorite channels can be selected through Troy Amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल