टॉसिलीझुमॅबच्या पुरवठ्याप्रकरणी एफडीएकडून रोचे कंपनीला होणार विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:40 AM2020-08-18T02:40:03+5:302020-08-18T02:40:13+5:30

मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले आहे.

The FDA will ask Roche about the supply of toxilizumab | टॉसिलीझुमॅबच्या पुरवठ्याप्रकरणी एफडीएकडून रोचे कंपनीला होणार विचारणा

टॉसिलीझुमॅबच्या पुरवठ्याप्रकरणी एफडीएकडून रोचे कंपनीला होणार विचारणा

Next

मुंबई : टॉसिलीझुमॅब इंजेक्शन कोरोनासाठी उपयुक्त नसल्याकारणाने त्याची आयात कमी प्रमाणात होत असल्याचे रोचे फार्मा कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, तरीही लोकांच्या गरजेसाठी या इंजेक्शनबाबत एफडीएकडून कंपनीला विचारणा करून आयात वाढवण्याची विनंती केली जाणार आहे. गंभीर कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शननंतर टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबईतील खासगी रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. मात्र, हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, डॉक्टरांनी टॉसिलीझुमॅब उपलब्ध होत नसेल तर त्याला पर्याय म्हणून इटॉलिझूमॅब किंवा रेमडेसिवीर या इंजेक्शनचा सल्ला नातेवाइकांना द्यावा असेही एफडीएकडून सांगण्यात आले आहे. सध्या या औषधांची मागणी अधिक असताना पुरवठा कमी असल्यामुळे रेमेडिसीवीर, इटॉलिझूमॅब ही औषधे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ही औषधे परिणामकारक आहेत, डॉक्टरांनी ही औषधे देण्याचाही सल्ला एफडीएकडून देण्यात आला आहे. राज्यभरात सध्या रेमडेसिवीरचे एफडीएकडे १८ हजारांहून डोस शिल्लक असून मुबलक पुरवठा आहे . तरीही सध्या टॉसिलीझुमॅब या औषधाचा पुरवठा बंद असला तरी या कंपनीकडे पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात एफडीए विचारणा करणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी सांगितले आहे.
आॅल फूड अँण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी यावरून एफडीए आणि सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारी सुरू असताना प्रभावी असणारे टॉसिलीझुमॅब दहा दिवसांहून अधिक दिवस उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे, याकडे यंत्रणांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: The FDA will ask Roche about the supply of toxilizumab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.