\Sलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली परिसरात गर्दीचा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी वकिलांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली असतानाच बोरीवली परिसरात मात्र नागरिकांची तौबा गर्दी पाहण्यास मिळत आहे. मुख्य म्हणजे त्यातील बरेच लोक हे तोंडावर मास्क घालत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला खतपाणी घातले जात आहे. बोरीवली पोलीस ठाणे ते जांभळी नाकापर्यंत फेरीवाले या ठिकाणी निष्काळजीने फिरत असल्याचे बोरीवली कोर्टातील वकिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस तसेच पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती स्थानिक तसेच वकिलांकडून करण्यात येत आहे.