भय इथले संपत नाही! सहा महिन्यांत कोविड रुग्णालयात आगीची दुसरी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:30 AM2021-03-27T02:30:25+5:302021-03-27T06:22:02+5:30

१२ ऑक्टोबर २०२० रोजी मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रामध्ये आग लागली होती. या वेळी रुग्णालयातील ४० रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले होते

Fear does not end here! The second fire at Kovid Hospital in six months | भय इथले संपत नाही! सहा महिन्यांत कोविड रुग्णालयात आगीची दुसरी घटना 

भय इथले संपत नाही! सहा महिन्यांत कोविड रुग्णालयात आगीची दुसरी घटना 

Next

मुंबई : कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या भांडुप - मुलुंड पट्ट्यातील रुग्णालयात आग लागण्याची गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात लागलेल्या आगीत रुग्णांना स्थलांतरित करताना दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, रुग्णालयाने रुग्णांना स्थलांतरित करताना सर्व खबरदारी घेतल्याचे चौकशीत आढळून आले होते.

१२ ऑक्टोबर २०२० रोजी मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रामध्ये आग लागली होती. या वेळी रुग्णालयातील ४० रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, स्थलांतर करताना अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला तर आणखी एका रुग्णाचा फोर्टिस रुग्णालयात दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या चौकशीत संबंधित रुग्णालयाने रुग्णांना स्थलांतरित करताना सर्व खबरदारी घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेनंतर संबंधित रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्याची परवानगी पालिकेने दिली नाही. 

रुग्णालयातील आगीच्या घटना

२९ ऑक्टोबर २०२० : दहिसर, कांदरपाडा परिसरात कोविड रुग्णालयात अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला आग लागली. या वेळी प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.

१७ डिसेंबर २०१८ : अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीत आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

एक रुपयाचा माल वाचला नाही
मॉलच्या मागील बाजूस असलेल्या अनेक दुकानदारांशी संवाद साधला. यात फरसाण, पाण्याच्या बाटल्या, वस्त्रे आणि संगणक विकणाऱ्या दुकानदारांचा समावेश होता. त्यांनी सांगितले की, हाती काहीच राहिलेले नाही. जे काही आहे त्याची राख झाली आहे. एक रुपयाचाही माल वाचलेला नाही. दरम्यान, संगणकाचे काही साहित्य म्हणजे जे जळाले नव्हते असे साहित्य काही दुकानदार मॉलमधून बाहेर घेऊन येत होते. मात्र त्याचेदेखील नुकसान झाले होते.

उष्णतेच्या लाटा, आगीच्या ज्वाळा
मुंबईचे कमाल तापमान गेल्या कित्येक दिवसांपासून ३७ अंश नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारीही फारसा काही फरक निदर्शनास आला नाही. सूर्य आग ओकत असतानाच मॉलमधून येणाऱ्या गरम वाफा शरीराहून घामाच्या धारा काढत होत्या.

येथे काहीच सुरक्षित नव्हते
मॉलच्या मागील बाजूस ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी पोलिसांना, अग्निशमन दलाला मोठी मदत केली. पाणी देण्यापासून चहा देण्यापर्यंत त्यांनी काम केले. मात्र आग लागलेल्या मॉलमध्ये कोणतीच गोष्ट सुरक्षित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मॉलची देखभाल-दुरुस्ती होत नव्हती. आग शमविण्यासाठी जे साहित्य लागते ते साहित्य येथे पुरेशा प्रमाणात नव्हते. 

घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी
महापालिकेचा अर्थसंकल्प कोट्यवधी रुपयांचा आहे. यातील काही पैसे आगीच्या घटना घडणार नाहीत यासाठी खर्च करायला हवेत.
अग्निशमन दल आणि पोलीस आग शमविण्यासाठी काम करत असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांना नागरिकांनी वडापाव दिला. पाण्याच्या बाटल्या आणि चहादेखील दिला.

Web Title: Fear does not end here! The second fire at Kovid Hospital in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग