Join us

अनोळखी व्यक्तीकडून घात होण्याची भीती; हातातील मोबाइल सोडा आणि तुमची मुले सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 4:06 PM

अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या गोष्टी खाऊ, पिऊ नयेअसे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी मुलांना पडल्याने मामाच्या गावी जाण्याची घाई मुलांना लागते. त्यामुळे बसस्थानकावर गर्दी वाढत असून याचा फायदा भुरटे चोर अथवा अन्य गुन्हेगार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहत मुले आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी. तसेच अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या गोष्टी खाऊ, पिऊ नयेअसे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रवाशांसोबत मैत्री करून त्यांना चहा, शीतपेय व अन्य खाण्यापिण्याच्या वस्तूमधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करत लुटीच्या घटना बस थांब्यांवर घडायच्या; मात्र आता प्रवासीही सतर्क झाले आहेत.

बस थांब्यावर तुम्ही सुरक्षित कारण...-  बस स्थानकावर सीसीटीव्हीची नजर -  खिसे कापूपासून सावध राहण्याच्या उद्घोषणा-  सामान चोरी झाल्यास फुटेज पाहता येईल-  मुंबई शहरामध्ये किरकोळ चोरीच्या घटना वगळता मोठे गुन्हे घडल्याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. पूर्वी अनधिकृत थांब्यांवर बस थांबविली जायची त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची चोरी होणे किंवा फसवणुकीच्या घटना घडत होत्या; मात्र आता आम्ही सतत खिसेकापूपासून सावधान अशी उद्घोषणा करत असतो. तसेच ठिकठिकाणी लावलेले सीसीटीव्हीही थांब्याना मॉनिटर करत आहेत असे अधिकारी सांगतात.

स्वत:च्या सामानाची काळजी घ्याप्रवाशांनी स्वतःच्या सामानाची काळजी स्वतः घेणे अत्यंत आवश्यक आहे. चोरीच्या घटना घडल्यास पोलिस जरी मदतीला असले तरी अशामुळे होणारा मनस्ताप टाळणे हे नागरिकांच्या हातात आहे. गाडीची वाट पाहताना मोबाइलवर तासन्तास राहण्याची सवय झाल्याने स्वतःच्या सामानावर किंवा मुलांवर दुर्लक्ष होते. 

मुलांना पोलिस शोधून देतात; मात्र या निष्काळजीपणामुळे एखादा अपघात किंवा अन्य दुखापत मुलांना होण्याची भीती असते. तसेच त्यांना कोणीतरी गोड बोलून फूस लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या मौल्यवान वस्तू आणि सामानासह आपल्या मुलांकडेही लक्ष पालकांनी देण्याचे आवाहन पोलिस करतात.

गुंगीचे औषध देऊन फसवणुकीचा एकही प्रकार गेल्या चार महिन्यांत मुंबईत तरी घडलेला नाही. बस थांब्यावर येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची आम्ही योग्य ती काळजी घेतो त्यामुळे अशा प्रकारांवर बऱ्यापैकी अंकुश बसला असून  प्रवासी सुरक्षित आहेत.    - अमित गिरमे, विभागीय वाहतूक अधिकारी

टॅग्स :मुंबई