रेड झोनमधील शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 04:53 PM2020-05-05T16:53:58+5:302020-05-05T16:54:41+5:30

विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होणार परिणाम

Fear of redundancy for teachers in the red zone | रेड झोनमधील शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती

रेड झोनमधील शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती

Next

 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी सुरु आहे आणि त्यामुळे शैक्षणिक संस्था , शाळा , कनिष्ठ महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलेली आहेत. शाळा सुरु झाल्यावरही याचा परिणाम दिसून येणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव शैक्षणिक प्रवेश लगेच होण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  अद्याप कोणत्याही अनुदानित शाळेत इय्यता १ ली ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत त्यामुळे या वर्षी बरेच शिक्षक पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे अश्या भीतीयुक्त गंभीर परिस्थितीत अनुदानित शाळेतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरीक्त करू नये अशा मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ,  शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव  यांना पाठविले आहे.

आता लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढल्यामुळे संपूर्ण राज्यातील अनुदानित शाळेतील प्रवेशप्रक्रिया रखडली आहेत . पुढील शैक्षणिक सत्राचे संपूर्ण वेळापत्रकाचे नियोजन बदलणार असल्याचे स्पष्ट आहे. शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही फार चिंतेत सापडले आहेत कारण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात त्यांची पदे मंजूर होतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा पट कमी झाला तर शिक्षकांचाही पट कमी होऊन त्यांना अतिरिक्त होण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत असल्याची स्थिती निर्माण झाल्याची माहिती अनिल बोरनारे यांनी सांगितले . मागील शैक्षणिक सत्र संपले असून लॉकडाऊन १७ मे पर्यंत असल्यामुळे  विद्यार्थ्यांचा प्रवेशावर याचा निश्चितच विपरीत परिणाम होऊन पुढील शैक्षणिक सत्रात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक होऊ शकतात त्यामुळे निदान रेडझोन जिल्ह्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांना पुढील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरविण्यात येवू नयेत व त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी  त्यांनी केली आहे.

---------------------------------

संचमान्यतेसाठी आधारनोंदणी करणार कशी ?
यंदा संचमान्यता होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यंची आधार नोंदणी करावी असे निर्देश शाळा , व संस्था चालकांना देण्यात आले आहेत. मात्र संचारबंदी असताना शिक्षक शाळांमध्ये जाणार कसे आणि ही माहिती अद्ययावत करणार कसे असा प्रश्न शिक्षक , मुख्यध्यापक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे २ मे पासून उन्हाळी सुट्टी दिली जाते , अशा वेळेस शिक्षकांना अतिरिक्त काम देणे कितपत योग्य आहे? असा सवाल शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केला आहे.

Web Title: Fear of redundancy for teachers in the red zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.