मुंबई : मुंबईतील कच-याचा भार पेलणा-या कचराभूमींपैकी एका मुलुंड कचराभूमीला टाळे लागल्यामुळे कचरा प्रश्न पेटला आहे. महापालिकेला कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. मात्र ही जागा मिळेपर्यंत कचºयाची समस्या कायम राहणार असल्याने महापालिकेने कचरा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी नियोजन करण्यास सर्व साहाय्यक आयुक्तांना प्रशासनाने बजावले आहे.मुंबईत दररोज सरासरी नऊ हजार ५०० टन कचरा जमा होत होता. गेल्या दोन वर्षांत विविध उपाययोजनांमुळे हा आकडा सात हजार २०० टनांपर्यंत खाली आल्याचा पालिकेचा दावा आहे.मात्र मुंबईतील कचºयाचे डोंगर पेलणाºया देवनार, कांजूर आणि मुलुंडपैकी २४ हेक्टर्सच्या मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्यात येणार आहे. या कचराभूमीवर कचरा टाकणे बंद केल्यामुळे अन्य दोन कचराभूमीवरील भार वाढला आहे. त्यामुळे मुंबईतील कचरा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. यावर उपाय म्हणून पालिका सुका व ओला कचरा वेगळा करणे आणि ओला कचºयापासून खतनिर्मितीवर भर देत आहे.मात्र या मोहिमेला अद्याप काही ठिकाणी प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कचरा कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विभागस्तरीय साहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलनाचा नियमितपणे आढावा घ्यावा. याबाबतचा दैनंदिन कचरा संकलन तक्ता आपल्या कार्यालयात लावावा. कचºयाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे, नियोजनाची परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.>अन्य कचराभूमींवरील भार वाढलामुंबईत दररोज सरासरी नऊ हजार ५०० टन कचरा जमा होत होता. गेल्या दोन वर्षांत विविध उपाययोजनांमुळे हा आकडा सात हजार २०० टनांपर्यंत खाली आल्याचा पालिकेचा दावा आहे. देवनार, कांजूर आणि मुलुंड या तीन कचराभूमीवर मुंबईतील कचरा टाकण्यात येतो. यापैकी मुलुंड कचराभूमीवर कचरा टाकणे बंद केल्यामुळे अन्य दोन कचराभूमीवरील भार वाढला आहे.दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांना आता त्यांच्याच आवारात ओल्या कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 6:05 AM