दरड कोसळण्याच्या भीतीने १०० कुटुंबं झाली स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:41+5:302021-09-13T04:05:41+5:30

मुंबई अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी, भांडुप आणि चेंबूर याठिकाणी घडल्या होत्या. या घटनांमुळे मुंबईत ...

Fearing landslides, 100 families migrated | दरड कोसळण्याच्या भीतीने १०० कुटुंबं झाली स्थलांतरित

दरड कोसळण्याच्या भीतीने १०० कुटुंबं झाली स्थलांतरित

Next

मुंबई

अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी, भांडुप आणि चेंबूर याठिकाणी घडल्या होत्या. या घटनांमुळे मुंबईत अजूनही भीतीचे वातावरण असून याच भीतीपोटी मालाड, कुरार येथील आंबेडकर नगरमधील १०० कुटुंबं स्थलांतरित झाली होती.

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी दिवसभर पाऊस कोसळत असतानाच मालाड, कुरार येथील आंबेडकर नगरमधील १०० कुटुंबे दरड कोसळण्याच्या भीतीने लगतच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित झाली होती. येथील रहिवाशांवर स्थलांतरित होण्याची वेळ तिसऱ्यांदा आली आहे. महत्त्वाचे म्हणजे दरडीलगत वास्तव्य करत असलेल्या नागरिकांचे सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशा आशयाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली. वन विभाग आणि महापालिका या प्रकरणात काहीच कार्यवाही करत नसल्याची खंत घर बनाओ घर बचाओ आंदोलनचे बिलाल खान यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Fearing landslides, 100 families migrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.