‘त्या’ अभियंत्याच्या लॉकरमध्ये घबाड

By admin | Published: November 4, 2014 12:35 AM2014-11-04T00:35:46+5:302014-11-04T00:35:46+5:30

सार्वजनीक बांधकाम विभागाचा लाचखोर अभियंता भुद्धेष रंगारी याच्या लॉकरमध्येही सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांना घबाड सापडले

Fearless in the 'lock' engineer's locker | ‘त्या’ अभियंत्याच्या लॉकरमध्ये घबाड

‘त्या’ अभियंत्याच्या लॉकरमध्ये घबाड

Next

नवी मुंबई: सार्वजनीक बांधकाम विभागाचा लाचखोर अभियंता भुद्धेष रंगारी याच्या लॉकरमध्येही सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांना घबाड सापडले. यात ४० लाख रूपये रोखड, ५० तोळ्याचे दागिने व घरांसह इतर मालमत्तांची कागदपत्रेही सापडली असल्याने रंगारी याने भ्रष्टाचार करून मोठी कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन पनवेलमधील भिंगारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ७३ हजाराची लाच घेताना रंगारीला ३१ सप्टेंबरला
रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या घरातून पोलीसांना १ कोटी २८ लाख ६५ हजार ५०० रूपये रोकड सापडली होती. त्याच्या ब्रिफकेसमधूनही लाखो रुपये सापडले होते. बँकेमध्ये असलेल्या लॉकरची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यानुसार सर्व बँकांमधील लॉकरमध्ये तब्बल ४० लाख रूपय सापडले तर जवळपास ५० तोळे दागिने हस्तगत केले आहेत. याशिवाय लॉकर्समधून मोठ्याप्रमाणात कागदपत्र सापडली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Fearless in the 'lock' engineer's locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.