जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य : राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:48+5:302021-03-15T04:06:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे ...

Feature of Indian culture: Governor | जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य : राज्यपाल

जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य : राज्यपाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रती दया व करुणेची शिकवण दिली आहे, असे सांगून ज्या लोकांनी कोरोना काळात पशुपक्षांची सेवा करून त्यांना जीवनदान दिले त्यांनी दैवी कार्य केले आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्राणीप्रेमींचा गौरव केला.

भायंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी कल्याण समिती या समाजसेवी संस्थेच्यावतीने कोरोना काळात पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी व आरोग्याची काळजी घेणाऱ्या १५ जीवप्रेमी कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनमध्ये जनजीवन ठप्प झाले असताना मुक्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची तसेच आरोग्याची दैना झाली. या कठीण काळात ज्या लोकांनी पशुपक्ष्यांना दाणा पाणी, दूध तसेच आजारी प्राण्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली त्यांनी साक्षात ईशसेवा केली आहे, असे राज्यपालांनी सांगितले. करोडो रुपये कमवून देखील जो आनंद मिळत नाही तो आनंद एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी वा अन्न देऊन मिळतो असे सांगून भारतातील लोकांमध्ये करुणा भाव असल्यामुळेच आपण इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा मुकाबला अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलो, असे राज्यपालांनी सांगितले.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गेले वर्षभर जैसल पार्क चौपाटी कल्याण समितीच्या जीवप्रेमी कार्यकर्त्यांनी पशुपक्ष्यांना अन्न, आजारी प्राण्यांवर उपचार, भटक्या प्राण्यांची नसबंदी तसेच मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार केल्याचे अध्यक्ष मोतीलाल गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Feature of Indian culture: Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.