पैशांच्या मागणीला कंटाळून प्रेयसीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:21+5:302021-06-02T04:06:21+5:30
प्रियकराला बेडया, गुन्हे शाखेची कारवाई पैशांच्या मागणीला कंटाळून प्रेयसीची हत्या प्रियकराला अटक; गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
प्रियकराला बेडया, गुन्हे शाखेची कारवाई
पैशांच्या मागणीला कंटाळून प्रेयसीची हत्या
प्रियकराला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रेयसीच्या सतत पैसे मागण्याच्या सवयीला कंटाळून प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत गुह्याचा छडा लावत, हत्या करून झारखंडला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला अटक केली. बिपिन विनोद कंडुलना असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, इशिता कुंजूर असे मृत तरुणीचे नाव आहे. दीड वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. आरोपी वांद्रे येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करतो, तर तरुणी घरकाम करत होती. रविवारी रात्री तरुणी बिपिनच्या लाल मिठी परिसरातील घरी गेली होती. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर तरुणीने बिपिनकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. इशिताच्या नेहमीच्या पैसे मागण्याच्या सवयीला तो कंटाळला होता. दोघे रात्री वांद्रे रिक्लमेशन परिसरात फिरायला गेले. वांद्र्यातील सेंट फ्रान्सिस्को परिसरात आल्यावर इशिता पुन्हा पैशांची मागणी करू लागली. यावेळी इशिता स्वत:चे कपडे फाडू लागली आणि जोरजोरात आरडाओरडा करू लागली. यामुळे बिपिन घाबरला आणि त्याने इशिताचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी हत्येची माहिती मिळताच, वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानेही समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने बिपिनपर्यंत पोहोचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला.
.................................