कॉम्प्युटर सायन्सची फी १० हजारांनी वाढली

By Admin | Published: July 8, 2016 02:31 AM2016-07-08T02:31:43+5:302016-07-08T02:31:43+5:30

मुंबई विद्यापीठाने ‘कॉम्प्युटर सायन्स’ विषयाची फी १७ हजारांवरून थेट २७ हजार केली आहे. विद्वत्त परिषदेच्या बैठकीत या नव्या फी वाढीला मंजुरी मिळाली आहे.

The fee for computer science increased by 10 thousand | कॉम्प्युटर सायन्सची फी १० हजारांनी वाढली

कॉम्प्युटर सायन्सची फी १० हजारांनी वाढली

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाने ‘कॉम्प्युटर सायन्स’ विषयाची फी १७ हजारांवरून थेट २७ हजार केली आहे. विद्वत्त परिषदेच्या बैठकीत या नव्या फी वाढीला मंजुरी मिळाली आहे.
व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नुकतेच ‘बीएसस्सी इन बायोटेक्नॉलॉजी’ आणि ‘कॉम्प्युटर सायन्स’ या विषयांचे अभ्यासक्रम वेगळे आणि व्यवसायाभिमुख केले. मात्र त्याचबरोबर यात तब्बल १० हजार रुपयांची फी वाढही केली आहे. विद्वत्त परिषदेच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली
आहे.
फी वाढीविरोधात तक्रार निवारण समिती सदस्य महादेव जगताप यांनी सांगितले की, कोणतीही प्राधिकरणे नसताना विद्यापीठाने अ‍ॅकॅडमिक काउन्सीलमध्ये काही सदस्यांच्या मंजुरीतून ही फी वाढ केली आहे. फी वाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा याचा नाहक फटका गरीब विद्यार्थ्यांना बसेल. (प्रतिनिधी)

कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकविण्यासाठी स्वतंत्र प्राध्यापक नियुक्त करावे लागतील; शिवाय अभ्यासक्रमही नवीन असल्यामुळे ही फी वाढ करण्यात आली आहे.
- डॉ. विजय जोशी,
विज्ञान शाखा समन्वयक

Web Title: The fee for computer science increased by 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.