‘लालबागचा राजा’च्या चरणी दिग्गजांनी टेकला माथा, रविवार बाप्पाच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:05 AM2017-08-28T04:05:49+5:302017-08-28T05:12:48+5:30

मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर याने पत्नी, मुलगी व मुलगा असे सहकुटुंब राजाचे दर्शन घेतले, तर दुपारी आयपीएलचे

On the feet of 'King of Lalbagh', the great men of Tilak Matha, on the feet of Ravi Bappa | ‘लालबागचा राजा’च्या चरणी दिग्गजांनी टेकला माथा, रविवार बाप्पाच्या चरणी

‘लालबागचा राजा’च्या चरणी दिग्गजांनी टेकला माथा, रविवार बाप्पाच्या चरणी

Next

‘लालबागचा राजा’च्या चरणी रविवारी दिग्गजांनी माथा टेकला. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्नीसह सकाळीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर याने पत्नी, मुलगी व मुलगा असे सहकुटुंब राजाचे दर्शन घेतले, तर दुपारी आयपीएलचे चेअरमन व खासदार राजीव शुक्ला आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर सहकुटुंब राजाच्या दरबारात हजर झाले होते. सायंकाळी मंडळाच्या वतीने शहिदांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात आले. या वेळी मंडळाकडून एकूण १० शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात आल्याचे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील वातावरण बाप्पाच्या आगमनाने भक्तीमय झाले आहे. रविवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने भाविक लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले होते. मुंबई शहर परिसरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील गणपती मंडपांबाहेर भाविकांची गर्दी दिसून आली.
गिरगाव, लालबाग, दादर, घाटकोपर, मुलुंड, गोरेगाव, बोरीवली, अंधेरी या ठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप भाविकांनी फुलून गेले होते. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने गणपती दर्शनासाठी बाहेर पडले होते. सकाळपासून दिसून आलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. शहरातील देखाव्यांसाठी प्रसिद्ध मंडळांबाहेर आज लांबच लांब रांगा होत्या.
वीकेन्ड्सची संधी साधून भाविकांनी गिरणगावातही जोरदार गर्दी केली. गिरणगावातील प्रमुख आकर्षण असलेले लालबागचा राजा, गणेशगल्ली आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या बाप्पांना पाहायला विशेष गर्दी झाली होती. त्याशिवाय, परळ येथील नरेपार्कचा राजा, तेजुकायाचा राजा, रंगारी बदक चाळ आणि काळाचौकीचा महागणपती या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ दिसून आली. काही ठिकाणी पारंपरिक देखावे तर काही ठिकाणी उंच मूर्तींनी भाविकांचे लक्ष वेधले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गिरणगावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत गिरणगावात वर्दळ दिसून आली. या ठिकाणी उपस्थित भाविकांमध्ये तरुणाईची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. याशिवाय, उत्सवातील ‘कॅमेराधारी’ भक्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या उल्लेखनीय होती.
गिरगावात पारंपरिक पद्धतीने साजºया करण्यात येणाºया गणेशोत्सव मंडळांमध्येही रविवारी गर्दी दिसून आली. वाड्यावाड्यांमध्ये साजºया होणाºया गणेशोत्सवाला सोडून गेलेल्या गिरगावकरांचीही उपस्थिती दिसून आली. गिरगावचा महाराजा, गिरगावचा राजासह केशवजी नाईक चाळ, जगन्नाथ चाळ, कामत चाळ येथील १२० वर्षांहून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांमध्येही भाविक आवर्जून हजेरी लावलेली दिसली.

मुंबई : मुंबईकरांना गणेशोत्सवाचा ‘फिव्हर’ चढला आहे. शहरात साजºया होणाºया सार्वजनिक गणेशोत्सवात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गिरगावातील खेतवाड्यांमधील गणेशोत्सव हा देखावे आणि गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. यंदा ‘खेतवाडीचा मोरया’ भाविकांचे खास आकर्षण झाला आहे. कारण, यंदा या मंडळाची गणेशमूर्ती ही २८ फुटांची आहे. हत्तीवर विराजमान झालेली ही मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेतवाडी ७ वी गल्ली मंडळाचे यंदाचे ६९ वे वर्ष आहे. दरवर्षी या मंडळाच्या गणेशाची उंची ही २५ फूट असते. यंदाही गणेशाची मूर्ती २५ फूट असून डोक्यावरील छत्रामुळे मूर्तीची उंची तीन फुटांनी वाढली असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. यंदा मंडळाने देखाव्यासाठी ‘गणपतीचे उंदीर वाहन कसे झाले’ या पौराणिक कथेची निवड केली आहे. भाविकांसह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी लाइट्सच्या माध्यमातून देखावा उभा करण्यात आला आहे. मंडळातर्फे दरवर्षी १ रुपया घेऊन ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शनाला घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे सल्लागार समितीचे गणेश भोकरे यांनी दिली.


सोशल मीडियावर ‘बाप्पा’ फिव्हर
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी ‘तो येतोय..’ असे वेध घेणारे बाप्पाचे व्हिडीओ, फोटोस् शेअरिंग सुरू होतेच. आता मात्र गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटर अशा सर्वच सोशल साइट्सवर बाप्पाच्या फोटोस्चा अक्षरश: पाऊस पडतोय. आपल्या बाप्पासोबतचे सेल्फी, बाप्पाचे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोस् अशा पोस्ट्स सर्वाधिक शेअर होत आहेत. याशिवाय, बाप्पाच्या आरतीचे ‘एफबी लाइव्ह’ करणे हासुद्धा अनोखा ट्रेंड दिसून येतोय. बरीचशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही सर्व सोशल साइट्सवर अ‍ॅक्टिव्ह असून यानिमित्ताने जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. याशिवाय, काही मंडळांनी आॅनलाइन गणेशपूजनाची संधी भक्तांसाठी खुली केली आहे. एकंदरीतच ‘आॅफलाइन’ सेलीब्रेशनसह बाप्पाचा ‘आॅनलाइन’ जागरही जोरात सुरू असल्याचे दिसून येते आहे.

Web Title: On the feet of 'King of Lalbagh', the great men of Tilak Matha, on the feet of Ravi Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.