धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी

By admin | Published: October 27, 2016 04:15 AM2016-10-27T04:15:34+5:302016-10-27T04:15:34+5:30

दसऱ्याच्या मुहूर्तावर ३०० कोटींचा गल्ला जमवलेल्या सराफा बाजाराचे लक्ष धनत्रयोदशीच्या मुहूर्ताकडे लागले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव चढाच

On the festival of Dhanteras, gold is bright | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी

Next

- चेतन ननावरे, मुंबई
दसऱ्याच्या मुहूर्तावर ३०० कोटींचा गल्ला जमवलेल्या सराफा बाजाराचे लक्ष धनत्रयोदशीच्या मुहूर्ताकडे लागले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव चढाच असला, तरीही यंदा बाजार ४०० कोटींची उलाढाल करण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे.
जैन यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चढा असतानाही दसऱ्याला राज्यातील सराफा बाजारात सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाली. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव कमी होण्याची वाट ग्राहक पाहत होते. मात्र अद्यापही सोन्याचा भाव प्रति तोळा ३० हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे किमान ४०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोन्याचा दर कमी असल्याने ५०० कोटींहून अधिक उलाढाल झाली होती.
याउलट तज्ज्ञांनी सोने खरेदीस अधिक पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर प्रति तोळा ३१ हजारांहून अधिक होता. मात्र दिवाळीपर्यंत तो प्रति तोळा ३० हजार २०० रुपयांपर्यंत उतरला आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला दसऱ्याहून अधिक धंदा होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशी सोने खरेदीसाठी शुभ मानली जाते. त्यात दिवाळीनंतर राज्यात लग्नसराईला सुरुवात होते. म्हणूनच दागिने करण्यासाठी ग्राहकराजाची लगबग दिसेल.

रेकॉर्डब्रेक उलाढाल दिसणार का?
गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या दरात सतत चढ-उतार दिसला आहे. याआधी २०११ साली प्रति तोळा २७ हजारांच्या घरात असलेल्या सोन्याने २०१२ साली थेट प्रति तोळा ३१ हजार रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर २०१३, १४ आणि १५ पर्यंत सोन्याच्या दरात सातत्याने घट झाली होती. याउलट या वर्षी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकराजा सोन्याची रेकार्डब्रेक खरेदी करेल, याबाबत सराफा बाजारात साशंकता आहे.


गेल्या पाच वर्षांत धनत्रयोदशीदिनी असलेले सोन्याचे दर खालीलप्रमाणे...
दिनांक दर
११ नोव्हेंबर, २०१५२५,४७१
२३ आॅक्टोबर, २०१४२६,०००
३ नोव्हेंबर, २०१३२९,८५८
१३ नोव्हेंबर, २०१२३१,६७८
२६ आॅक्टोबर, २०११२७,५६७
(रुपये/तोळा)

Web Title: On the festival of Dhanteras, gold is bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.