प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांचा जीवाशी खेळ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:01 AM2020-01-07T00:01:05+5:302020-01-07T00:01:11+5:30

शहरात व उपनगरात प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांकडून विषारी सापांना पकडून त्यांच्यासोबत स्टंटबाजी करत जीवाशी खेळ करणे सुरूच आहेत.

The fiery game of non-trained serpents started | प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांचा जीवाशी खेळ सुरूच

प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांचा जीवाशी खेळ सुरूच

googlenewsNext

मुंबई : शहरात व उपनगरात प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांकडून विषारी सापांना पकडून त्यांच्यासोबत स्टंटबाजी करत जीवाशी खेळ करणे सुरूच आहेत. सध्या अशा सर्पमित्रांचा सुळसुळाटही वाढत आहे. विषारी साप हाताळण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. प्रशिक्षण न घेता सापाला पकडणे धोकादायक असते. साप आढळून आल्यावर त्वरित प्राण्मिित्र संस्था किंवा संघटनेला संपर्क करून माहिती द्यावी, अशी माहिती प्राणिमित्रांनी दिली.
नुकताच मुलुंडमधील परिसरामध्ये एक साप आढळला होता. तिथे पॉज-मुंबई संस्थेचा सर्पमित्र जाईपर्यंत एका तरुणाने सापाला पकडून घेऊन फिरत होता, तसेच त्याने तो साप गळ्यात टाकून फोटोही काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, संस्थेचा सर्पमित्र घटनास्थळी पोहोचून त्या तरुणांकडून सापाला आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा हा विषारी नाग प्रजातीचा साप असल्याचे समजले, याशिवाय विक्रोळीमध्येही एक साप आढळून आला होता. तिथे पॉज-मुंबई संस्थेचा सर्पमित्र जाण्याअगोदरच एका तरुणाने सापाला पकडून घेऊन गेला. सापाला पकडल्याचा व्हिडीओसुद्धा चित्रित केला होता. त्यावेळी त्याच्या हाताला सर्पदंश झाल्याचे व्हिडीओमध्ये ऐकिवात येत आहे. सर्पमित्रांनी सापाला त्या तरुणांकडून ताब्यात घेतल्यावर तो विषारी घोणस असल्याचे समजले.
मे, २०१९ मध्ये शिवडी कोळीवाड्यामध्ये राजू सोलंकी (२०) या तरुणाला सर्पदंश झाला होता. यावेळी राजू सापाला चुकीच्या पद्धतीने पकडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होते. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे कृत्य करणाऱ्या प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांना कोणती संस्था प्रशिक्षण देते, याचा शोध घेऊन कारवाई झाली पाहिजे. सर्पमित्राला सर्पदंश झाल्यावर त्याची माहिती संबंधित संस्थेने किंवा संघटनेने वनविभाग आणि डॉक्टरांना दिली पाहिजे. मात्र, स्टंटबाज सर्पमित्रांची माहिती कोणत्याही संस्था व संघटनेला दिली जात नाही, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष कुंजू यांनी दिली.
>‘सर्पमित्राचे ओळखपत्र तपासायलाच हवे’
ज्या वेळी एक प्रशिक्षित सर्पमित्र अगदी सहजगतीने साप ताब्यात घेतो, तेव्हा काही तरुण प्रसिद्धीसाठी सापाला पकडतात, त्यात त्यांचा जीवही जातो. त्यामुळे यांना ‘सर्पमित्र’ म्हणता येत नाही. सर्पमित्रांकडे संस्थेचे किंवा वनविभागाचे ओळखपत्र आहे का? तो कोणत्या संस्थेशी निगडित आहे का? संस्थेकडून पाठविलेले सर्पमित्र प्रशिक्षित आणि अनुभवी असतात. सर्पमित्रांकडे संस्थेचे टी-शर्ट, जीन्स, पायामध्ये जाड बूट व सापाला पकडण्याचे साहित्य इत्यादी गोष्टी असणे आवश्यक असते. त्यावरून खºया सर्पमित्रांची ओळख पटते.
- संतोष शिंदे, संस्थापक, सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाइल्स अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) संस्था

Web Title: The fiery game of non-trained serpents started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.