फिफा समाधानी पण वेग वाढवा!
By admin | Published: March 23, 2017 05:16 PM2017-03-23T17:16:32+5:302017-03-23T17:16:32+5:30
शिष्टमंडळाची पाहणी : स्पर्धास्थळांना भेटी
Next
श ष्टमंडळाची पाहणी : स्पर्धास्थळांना भेटी नवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये होणार्या 17 वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीचा ‘काउंटडाउन’ सुरू झाला आहे.त्यासाठी फिफाचे शिष्टमंडळ भारतात दाखल झाले असून त्यांनी स्पर्धास्थळांना भेट द्यायला सुरुवात केली. बुधवारी शिष्टमंडळाने दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी केली. त्यांनी तयारीवर समाधान व्यक्त केले असले तरी महत्त्वपूर्ण क्षेत्रात म्हणजे प्रतिस्पर्धी आणि ट्रेनिंग यांच्यातील कामात वेग वाढविण्याची सूचना केली. या स्पर्धेसाठी आता केवळ 200 दिवस उरले आहेत. फिफाचे आठ सदस्यीय शिष्टमंडळ आणि त्यांचे प्रमुख जैमे यार्जा हे देशातील आठ केंद्रांना भेट देणार आहेत. यार्जी म्हणाले, की आम्ही समाधानी आहोत. कामात सुधारणा होताना दिसत आहे. असे असले तरी दिल्ली जगातील महत्त्वपूर्ण शहर आहे. येथील स्टेडियमला सर्वाधिक सुंदर सादर केले पाहिजे. आम्हाला इतर गोष्टीत काही कमतरता आढळल्या नाहीत. तयारीच्या कामांत अधिक वेग असावा, असे वाटते. ट्रेनिंग आणि प्रतिस्पर्धीच्या क्षेत्रातील थोडे काम बाकी आहे. आयोजकांकडे चांगल्या योजना असून ते योग्य रणनीतीनुसार काम करीत आहेत. दिग्गज येतील..या स्पर्धेच्या प्रचारार्थ काही दिग्गज खेळाडू भारतात येतील. 20 वर्षांखालील विश्वचषक ‘ड्रॉ’साठी दिएगो माराडोना आणि पाब्लो आइमार हे कोरियात गेले होते. 15 मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. भारतात होणार्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या प्रचारासाठी काही दिग्गज येतील. आम्ही त्या नावांचा विचार करीत आहोत. सध्यातरी त्यांची नावे माझ्याकडे नाहीत. फुटबॉल जगतातील स्टार खेळाडूंना या स्पर्धेच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी करू, असे यार्जा म्हणाले.