Fifa World Cup 2022 : मुंबईमध्ये तयार झाली फिफा ट्रॉफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 06:00 AM2022-12-21T06:00:24+5:302022-12-21T06:00:54+5:30
अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्या दरम्यान रंगलेला फिफा वर्ल्ड कप सामन्याचा थरार संपूर्ण जगाने अनुभवला.
मुंबई : अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्या दरम्यान रंगलेला फिफा वर्ल्ड कप सामन्याचा थरार संपूर्ण जगाने अनुभवला. विजयी अर्जेंटिनाच्या संघाने उंचावलेली फिफाची सोन्याची ट्रॉफीही सर्वांनी पाहिली असेल. विशेष कौतुकाची बाब म्हणजे ही ट्रॉफी मुंबईतील एका प्रख्यात ज्वेलर्स आणि डायमंड उद्योगाच्या उपकंपनीने साकारली आहे.
ही कंपनी थ्री डी प्रीटिंगच्या क्षेत्रात विशेष नावाजलेली आहे. हा लौकिक पाहूनच कंपनीला हे काम सोपविण्यात आले होते. ही ट्रॉफी पितळेपासून तयार केलेली असून त्यावर २४ कॅरेट सोन्याचे प्लेटिंग करण्यात आलेले आहे. विजेत्या संघाला दिली जाणारी ट्राॅफी ही मूळ ट्रॉफीची प्रतिकृती असते. मूळ ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जात नाही. मूळ ट्रॉफी ६.५ किलो सोन्यापासून बनविलेली आहे.