पालिका अनुकंपा नोकरभरतीत पंधरा आरोपी

By admin | Published: January 12, 2016 02:43 AM2016-01-12T02:43:21+5:302016-01-12T02:43:21+5:30

पालिकेच्या सफाई कामगाराच्या चतुर्थ श्रेणीतील नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींचा आकडा आता १५वर पोहोचला आहे.

Fifteen accused in the municipal cadre bureaucracy | पालिका अनुकंपा नोकरभरतीत पंधरा आरोपी

पालिका अनुकंपा नोकरभरतीत पंधरा आरोपी

Next

मुंबई: पालिकेच्या सफाई कामगाराच्या चतुर्थ श्रेणीतील नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींचा आकडा आता १५वर पोहोचला आहे. यातील मास्टरमाइंड असलेल्या आरोपी प्रशील वाघमारेने घोटाळ्यातून उकळलेला पैसा परदेशवारी, कॅसिनो तसेच बारमध्ये उडविल्याची माहिती तपासात समोर आली.
पालिकेत लाखो रुपये घेऊन बोगस पद्धतीने सफाई कामगार भरती होत असल्याचा घोटाळा गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता. या प्रकरणी डी आणि जी दक्षिण वॉर्डमधील तब्बल १३ जणांना अटक केली होती. यातील जी दक्षिण वॉर्डमधील रमेश भिका राठोड (५०)सह अटक करण्यात आलेला आरोपी लिपिक वाघमारे हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले.
घोटाळ्यामध्ये बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या मुकेश झाला (५१)सह पालिकेतील लिपिक प्रमोद कासकर (५०) याला गुन्हे शाखेने सोमवारी गजाआड केले. या प्रकरणी पालिकेतील आणखी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fifteen accused in the municipal cadre bureaucracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.