पंधरा कोटींचा बाँड अन् पाच कोटी कॅश; उपेंद्र सावंतबाबत सुनिल राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 01:07 PM2023-08-30T13:07:27+5:302023-08-30T13:08:32+5:30
विक्रोळीतील प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, असंही सुनील राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई: उद्धव बाळासाहेब गटाचे मुंबईतील विक्रोळी विभागातील कन्नमवारनगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नसल्याने व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे उपेंद्र सावंत यांनी सांगितले.
उबाठा गटाचे #मुंबई तील #विक्रोळी विभागातील #कन्नमवार_नगर चे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 30, 2023
सावंत यांनी यावेळी बोलताना गेले दीड वर्षे आपल्या… pic.twitter.com/xAldbMXn8h
उपेंद्र सावंत यांच्या या प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. १० दिवसांपूर्वी मला उपेंद्र सावंत भेटले होते. त्यावेळी त्यांनी निधी करिता १५ कोटी व पाच कोटी कॅश, अशी ऑफर असल्याचे सांगितले होते. पण मी घरी बसेल, मात्र शिंदेंच्या पक्षात जाणार नाही, असा दावा उपेंद्र सावंत यांनी केला होता, असा गौप्यस्फोट सुनील सावंत यांनी केला. तसेच विक्रोळीतील प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, असंही सुनील राऊत यांनी स्पष्ट केले.
उपेंद्र सावंत यांना मी खूप फोन केले. मात्र त्यांनी माझे फोन उचलले नाही. त्यानंतर मी त्यांच्या बहिणीला फोन केला आणि तिला सांगितले की मी नसतो तर उपेंद्र सावंत आज जेलमध्ये असते. उपेंद्र सावंत फक्त आपल्या बायको पोरांना घेऊन गेला असेल. विक्रोळीतील कन्नमवार आणि टागोरनगरमध्ये आगामी काळ हा शिवसेनेचाच असणार, असा दावाही सुनील राऊतांनी यावेळी केला.