अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 10:01 PM2024-11-01T22:01:41+5:302024-11-01T22:10:29+5:30

मुंबईतील अंधेरी पूर्वेमध्ये काही दुकानांना आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fifteen to 20 shops caught fire in Andheri East fear of workers getting trapped, fire engines arrived | अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल

अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल

मुंबईतील अंधेरी पूर्वमधील एमआयडीसीमधील भंगारवाडीमध्ये दुकानांना भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात मोठे आगीचे लोट दिसत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या ५ ते ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला एका दुकानातील लागलेली आग आता पंधरा ते वीस दुकानापर्यंत पोहोचली आहे. ही आद लाकूड गोमदामामध्ये ब्लॉस्ट झाल्यामुळे लागल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेली माहिती अशी, सुरुवातीला आग सिलेंडरच्या ब्लॉस्टमुळे लागली. ही आग बाजूच्या दुकानांमध्ये पसरली. आग वाढत पंधरा ते वीस दुकानांना लागली. या सर्व गोदामला मोठ्या संख्येमध्ये काम करणारे कामगार आहेत. काही कामगार बाहेर निघाल्याची माहिती मिळत आहे, तर काही कामगार आत अडकल्याचा भीती देखील व्यक्त केली जात आहे. 

आगीची माहिती कळताच स्थानिकांनी अग्निशमन यंत्रणेला याची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमनच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी आल्या. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Fifteen to 20 shops caught fire in Andheri East fear of workers getting trapped, fire engines arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग