Join us

बनावट लसीकरणप्रकरणी पाचवी एफआयआर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बनावट लसीकरणप्रकरणी पाचवी एफआयआर गुरुवारी बांगूरनगर पोलिसांनी ...

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बनावट लसीकरणप्रकरणी पाचवी एफआयआर गुरुवारी बांगूरनगर पोलिसांनी दाखल केली. पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे लसीकरण करण्यात आले हाेते. ज्यात २०७ लोकांना लस देण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार याप्रकरणी पाेलीस अधिक चौकशी करत आहेत.

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली, त्यात सरकारी बँक तसेच खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बोरिवलीच्या आदित्य महाविद्यालयातील २१३ जणांच्या बनावट लसीकरणप्रकरणी बुधवारी बोरिवली पोलिसांनी चौथा दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ज्यात कोकिलाबेन रुग्णालयाचा माजी कर्मचारी राजेश पांडे, शिबिर आयोजक संजय गुप्ता आणि मास्टरमाइंड महेंद्र सिंग याच्यासह आणखी पाच जणांची नावे आहेत. या टोळक्याने अद्याप ९ ठिकाणी असे बनावट लसीकरण शिबिर आयोजित केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, त्यात आदित्य महाविद्यालयासह चित्रपट प्रोडक्शन हाऊस, हिरानंदानी हेरिटेज सोसायटी यांचा समावेश आहे.

...............................