Join us

प्रशासनाविरोधातमनसेचा लढा

By admin | Published: April 14, 2016 1:35 AM

चार वर्षांमध्ये १६०० कोटी रुपयांची कंत्राटे विनानिविदा देण्यात आल्याचा आरोप करीत मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़

मुंबई : चार वर्षांमध्ये १६०० कोटी रुपयांची कंत्राटे विनानिविदा देण्यात आल्याचा आरोप करीत मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़शिक्षण विभागात अतिमहत्त्वाच्या कामांना ७२/३ अंतर्गत मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना असतात़ मात्र गेल्या चार वर्षांत कचरा उचलणे, औषध खरेदी, अग्निशमन विभाग, स्टेशनरी खरेदी ही कामे ७२ ३ अंतर्गत मंजूर करण्यात आली आहेत़ या कामांसाठी निविदा काढण्याऐवजी प्रशासनाने आपल्या अधिकारात कामे मंजूर करुन घेतली आहेत, असा आरोप मनसेने केला आहे़कचरा उचलण्यासाठी १०० कोटी, मेडिकल खरेदीसाठी २०० कोटी, स्टेशनरी २५ कोटी, शालेय इमारतींना टेकू लावण्यासाठी ५० कोटी, कीटकनाशक मनुष्यबळ ठेका देण्यासाठी १९ कोटी या कामांना २०१२ मध्ये मंजुरी देण्यात आली,असा दावा देशपांडे यांनी केला़ (प्रतिनिधी)