त्रस्त नागरिकांचा पालिकेवर मोर्चा
By admin | Published: August 22, 2014 12:47 AM2014-08-22T00:47:18+5:302014-08-22T00:47:18+5:30
पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर जनसेवा सामाजिक विकास संस्थेने मोर्चा काढला.
Next
मालाड : पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयावर जनसेवा सामाजिक विकास संस्थेने मोर्चा काढला. मालाड पश्चिमेच्या मालवणी परिसरातील काही भागात गेल्या आठ महिन्यांपासून पाण्याची समस्या असून त्याचा फटका 3क् ते 35 हजार नागरिकांना बसत आहे. याकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनसेवा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष रामदास हैसरे यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी या परिसरात पाणीटंचाई उद्भवल्याने पालिकेकडून पाणीकपात करण्यात आली होती. गणोशनगर, मालवणी गेट क्रमांक आठ अशा काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याची, तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी गटाराचे पाणी येत असल्याने ते पाणी वापरण्याजोगे नाही. त्यामुळे टॅँकरचे पाणी, बिस्लरी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन दिवस काढत असल्याचे येथील त्रस्त नागरिक बशीर शेख यांनी सांगितले.
गणोशनगर येथे केवळ अर्धा तास पाणी येत असून पाण्याला दाब नसल्याने सर्वाना पाणी भरण्यास मिळत नाही. त्यामुळे आम्हाला तीन ते पाच रुपये मोजून एक हंडा पाणी विकत घ्यावे लागते. बरेच वेळा त्याही पाण्याला वास येत असल्याने जेवणासाठी वापरू शकत नाही. पैशाबरोबरच आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे, असे नागरिक शेख नुरून्निसा यांनी सांगितले. या मोर्चात तृतीयपंथींनीही मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला होता. आम्ही रोज 75 रुपये खर्च करून पिण्याचे पाणी विकत घेतो. रोज जर पाण्यासाठी इतके पैसे खर्च करावे लागत असतील तर तुटपुंज्या कमाईत आम्ही कुटुंब कसे चालवणार, असा सवाल त्यांनी केला. गढूळ पाण्याने रोगराईचे प्रमाणही वाढले आहे. मुलांच्या आरोग्यावरही त्याचा मोठा दुष्परिणाम होत आहे, असे स्थानिक रहिवासी नीलेश पुजारे यांनी सांगितले.
नागरिकांना अनेक महिने पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पालिकेकडून दोन दिवसांत पाण्याचा दाब वाढवणार असून पाणीकपात पूर्णपणो बंद करण्यात येण्याचे आश्वासन महापालिका अधिका:यांतर्फे देण्यात आले. तसेच आझमी नगर येथे 25क् मिमीची 32 मीटर लांबीची पाइपलाइन ऑक्टोबर महिन्यार्पयत बसवण्याची हमी साहाय्यक पालिका आयुक्त देवेंद्र जैन यांनी या वेळी दिल्याचे हैसरे यांनी सांगितले. येत्या सात दिवसांत पाण्याची समस्या दूर न झाल्यास पालिकेबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही हैसरे यांनी या वेळी दिला. (प्रतिनिधी)
च्काही महिन्यांपूर्वी या परिसरात पाणीटंचाई उद्भवल्याने पालिकेकडून पाणीकपात करण्यात आली होती. गणोशनगर, मालवणी गेट क्रमांक आठ अशा काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याची, तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
च्गणोशनगर येथे केवळ अर्धा तास पाणी येत असून पाण्याला दाब नसल्याने सर्वाना पाणी भरण्यास मिळत नाही. त्यामुळे आम्हाला तीन ते पाच रुपये मोजून एक हंडा पाणी विकत घ्यावे लागते, असे येथील रहिवासी सांगतात.