Join us

टाटा टॉवर विरोधातील लढा सुरुच

By admin | Published: September 20, 2014 10:19 PM

टाटा टॉवर विरोधातील लढा सुरुच, रहिवाशांंची न्यायालयात धाव

टाटा टॉवर विरोधातील लढा सुरुच, रहिवाशांंची न्यायालयात धाव
मुंबई: भांडुप उषा नगर सोसायटीच्या टाटा पॉवरच्या टॉवर विरोधातील लढा हा अधिक तीव्र होत असून रहिवाशांनी आता न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारपर्यंत काही कारणास्तव येथील काम थांबविण्यात आले असल्याचे समजते.
४५ वर्षे जुन्या भांडुप उषा नगर सोसायटीमध्ये ४५० कुटंुबे वास्तव्यास आहे. अशात इमारतीच्या बाजूने टाटा पॉवरच्या विद्युत प्रवाह करणार्‍या ११० केव्ही वॅट क्षमतेच्या विद्युत वाहक तारा गेलेल्या आहेत. असे असताना त्यात वाढ करत त्याठिकाणी २२० केव्ही वॅट चे ट्रॉम्बे सेलसेट लाईनच्या कामासाठी नवीन ट्रान्समिशन टॉवरचा पाया रचण्याचे काम सुरु होणार आहे. मात्र उषा नगर येथील रहिवाशांनी याला विरोधात शुक्रवारी कर्मचार्‍यांना इमारती परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. शुक्रवारी उशीरापर्यंत पोलीस आयुक्त राकेश मारिया यांंच्याशी बैठक पार पडली. यावर तत्काळ स्थगिती आणण्यासाठी उषा नगर येथील रहिवाशांनी आज हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याचे रहिवाशी सनील सत्यनाथन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सोमवारी हायकोर्टात याबाबत काय निर्णय होतो हे स्पष्ट होणार असल्याचेही सत्यनाथन यांनी सांगितले.