वेध विधानसभेचा : शिवसेना-मनसेसाठी प्रतिष्ठेची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 01:52 AM2019-09-02T01:52:02+5:302019-09-02T01:52:06+5:30

वेध विधानसभेचा

Fighting for dignity for Shiv Sena-MNS | वेध विधानसभेचा : शिवसेना-मनसेसाठी प्रतिष्ठेची लढत

वेध विधानसभेचा : शिवसेना-मनसेसाठी प्रतिष्ठेची लढत

Next

शेफाली परब-पंडित 

मुंबई : पाटी कोरी असताना मनसेला बळ देणारा माहीम-दादर विधानसभा मतदारसंघ २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा काबीज केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मनसेच्या स्थापनेनंतर सतत बदल होत राहिले. उभय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने येथील लढत नेहमी चुरशीची ठरली आहे. त्यामुळे पीछेहाट झालेल्या मनसेला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या मतदारसंघातच संधी आहे.

मराठी लोकवस्ती असलेला माहीम, दादर मतदार संघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नवीनच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला दणका दिला. मनसेचे नितीन सरदेसाई आमदारपदी निवडून आले होते. त्यावेळी मनसेला या मतदारसंघात मिळालेल्या मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती.
२०१४ मध्ये मनसेची हवा सरली आणि पुन्हा शिवसेनेला या मतदारसंघात संधी मिळाली. त्यावेळीस सदा सरवणकर पक्षात परतले आणि आमदारपदी निवडून आले. तरीही मनसेला येथे दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. सहा हजार मतांनी नितीन सरदेसाई यांचा पराभव झाला होता. काँग्रेसला या मतदारसंघात चेहरा नसल्याने नेहमीच दुसºया पक्षातून उमेदवार आयत करावे लागले आहेत. सदा सरवणकर यांना काँग्रेसमधून उमेदवारी देऊन माहीममध्ये हात मजबूत करण्याचा प्रयत्न २००९ मध्ये केला होता. यावेळेसही काँग्रेसला तगड्या उमेदवाराची शोधाशोध करावी लागत आहे.

माहीम-दादर मतदारसंघात पालिका निवडणुकीमध्ये मनसेने शिवसेनेला मात दिली होती. परंतु, २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे मनसेकडे एकमेव नगरसेवक उरला आहे. मनसेचे महापालिकेतील गटनेतेपदही गेले. मनसेला आपले अस्तित्व दाखविण्यासाठी विधान सभेतच संधी आहे. माहीम मतदारसंघात
मनसेने जोर लावला आहे.
नितीन सरदेसाई आणि मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांचे नाव येथे चर्चेत आहे. शिवसेनेतून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे नाव सध्या पुढे आहे.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील सर्वाधिक मते माहीम-दादर मतदारसंघातून शिवसेनेला ९१ हजार ६४५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला ३८ हजार १४५ मते मिळाली होती. मनसेने ही मते आपल्याकडे वळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारांच्या भेटीगाठी, बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. ही लढत प्रतिष्ठेची व चुरशीची ठरणार आहे.


मतदारसंघ : माहीम

च्२०१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला माहीम मतदारसंघातून ९१ हजार ६३५ मतं मिळाली होती.
च्काँग्रेसला ३८ हजार १४५ मतं मिळाली आहेत.

२००९ -
नितीन सरदेसाई (मनसे) - ४८७३४
सदा सरवणकर (काँग्रेस) - ३९८०८
आदेश बांदेकर (शिवसेना) - ३६३६४
२०१४
सदा सरवणकर (शिवसेना) - ४६२९१
नितीन सरदेसाई (मनसे) - ४०३५०
विलास आंबेकर - (भाजप) - ३३४४६

Web Title: Fighting for dignity for Shiv Sena-MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.