७३१ कोटींची थकबाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरणच्या भांडुप परिमंडळात वीज जोडणी तोडण्याची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. भांडुप परिमंडलाची थकबाकी एकूण ७३१.०६ कोटी रुपये होती. विनंती करून व सूचना देऊनसुद्धा ग्राहक बिलाचे पैसे भरण्यात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.
येथील उच्चदाब ग्राहकांची थकबाकी ११३.४३ कोटी रुपये होती. लघुदाब ग्राहकांची थकबाकी ६१७.६३ कोटी आहे. सध्या अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजमीटरची तपासणी करीत आहेत. यामध्ये, शेजाऱ्याकडून अथवा परस्पर वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केल्या आहेत.
--------------------
घरगुती ग्राहकांचे - २००.८ कोटी
व्यावसायिक - १०४.७७ कोटी
औद्योगिक - ८९.०४ कोटी
पाणीपुरवठा योजनांचे - ७.१३ कोटी
स्ट्रीट लाइट - १९८.८५ कोटी
इतर ग्राहकांचे - १२.१९ कोटी रुपये
एकूण - ७३१.०६ कोटी थकीत आहेत.