मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; आझाद मैदानावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:32 AM2018-03-04T02:32:43+5:302018-03-04T02:32:43+5:30
मराठा आरक्षणाबाबत लेखी आश्वसन देऊनही अद्याप राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून शनिवारी आझाद मैदान येथे करण्यात आली.
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत लेखी आश्वसन देऊनही अद्याप राज्य सरकारने त्यासंदर्भात कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून शनिवारी आझाद मैदान येथे करण्यात आली. मुंबई मराठा क्रांती मोर्चादरम्यान ४ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूला मुख्यमंत्री कारणीभूत असून, या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
मराठा समाजाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे काढण्यात आले. या वेळी मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा, सारथी संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करावी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहांसाठी जागा द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत लेखी आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने शनिवारी आझाद मैदानात केली.