Join us

‘त्या’ कंत्राटदाराचे पैसे थकविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:06 AM

आत्महत्या प्रकरण; ताडदेव पोलिसांकडून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एनएससीआयच्या (नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया) बेसमेंटमध्ये रविवारी ...

आत्महत्या प्रकरण; ताडदेव पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एनएससीआयच्या (नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया) बेसमेंटमध्ये रविवारी संध्याकाळी राजेश तावडे या बांधकाम कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पैसे थकविणाऱ्या व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ७ ते ८ जणांविरुद्ध ताडदेव पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तावडे हे सबकंत्राटदार म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एनएससीआयच्या बेसमेंटमधील पाण्याच्या पाइपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. घटनास्थळावरून तावडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पाेलिसांना सापडली. यात आठ ते दहा कंत्राटदारांची नावे आणि त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा आहे. पैसे थकल्यामुळे मजुरांचे पैसेही त्यांना देता येत नव्हते. याच तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याची माहिती समोर आली.

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तावडे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दुजोरा दिला. सुसाईड नोटमध्ये दिलेल्या नावांनुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

...........................