कंगना, रंगोलीविरोधात खार पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:30+5:302021-03-13T04:10:30+5:30
परवानगीशिवाय पुस्तकातील कथेच्या आशयाचा ट्विटमध्ये वापर; लेखकाचा आराेप लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर’ ...
परवानगीशिवाय पुस्तकातील कथेच्या आशयाचा ट्विटमध्ये वापर; लेखकाचा आराेप
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर’ या पुस्तकातील काही भाग अभिनेत्री कंगना रनाैतने तिच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेचे ट्विट करताना वापरला. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही, असा आरोप पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी करून याबाबत वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
काैल यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या पुस्तकातील कथेचा आशय असलेला ईमेल त्यांनी कंगनाला पाठवला होता. सदर ईमेलमधील कथेचा काही भाग कंगनाने तिच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा करताना मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय ट्विटमध्ये वापरला. त्यामुळे तिने त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. त्यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने शुक्रवारी सीआरपीसी १५६(३) अन्वये कंगनासह तिची बहीण रंगोली चंडेल, भाऊ अक्षत रनाैत आणि कमलकुमार जैन यांच्या विरोधात विश्वासघात, फसवणूक व कॉपीराइटचे उल्लंघन इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
................................