लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चेंबूरमध्ये पाण्याची टाकी साफ करताना जेट स्प्रे मशीनचा इलेक्ट्रिक शाॅक लागून ब्रिजेशकुमार यादव या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्याच्या कंपनीच्या मालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ब्रिजेशकुमार याचा भाऊ आशिष कुमार याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ब्रिजेशकुमार हा ५ वर्षांपासून मुंबईत राहण्यास होता. तो वाॅटर क्लिनिंगचे काम करायचा.
२ मार्च रोजी चेंबूर येथे अमृत सोसायटीत पाण्याची टाकी साफ करताना जेट स्प्रे मशीनचा इलेक्ट्रिक शाॅक लागून त्याचा मृत्यू झाला. यात त्याचे कंपनीचे मालक प्रतीक जाधव याने सुरक्षेची खबरदारी न घेतल्यामुळे भावाचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.