मुंबई - पाक प्रशिक्षित फैजल मिर्झासह छोटा शकीलचा हस्तक अल्लाहरखा अबुबकार मन्सुरी (३०) विरुद्ध राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी विशेष सत्र न्यायालयात १ हजार १५५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आणखी दोघे फरार असून त्यांचा तपास एटीएसकडून सुरू आहे.जोगेश्वरीतील बेहरामबाग येथे राहणाऱ्या फैजलला आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानातील प्रशिक्षण केंद्रात पाठवणारा आतेभाऊ फारुख देवडीवाला छोटा शकीलचा विश्वासू हस्तक आहे. १ मार्च २०१८ ला फैझलने दुबईत फारुखची भेट घेतली. शारजात असलेल्या फारुखने दहशतवादी कारवायांसाठी आयएसआयच्या इशाºयावरून फैजलला पाकिस्तानात पाठवले होते.तेथे दहशतवादी केंद्रात १२ दिवस विविध हत्यारे चालविणे, स्फोटके बनविणे आदी प्रशिक्षण देण्यात आले. फैजलला वाहने, हत्यारे देण्यास मदत करणाºया अल्लारखाँ अबुबकार मन्सुरी (३०) याला गुजरातमधून १६ मे रोजी अटक झाली. बुधवारी एटीएसने दोघांवर दोषारोपपत्र दाखल केले. यात वरील तपास, जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांचा समावेश आहे.
संशयित दहशतवादी फैजल मिर्झाविरुद्ध दोषारोप दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 4:41 AM