फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: October 15, 2016 07:09 AM2016-10-15T07:09:04+5:302016-10-15T07:09:04+5:30

गिरगाव येथील भद्रन हाउस पुनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याच्या आरोपावरून विकासक वर्धमान लाइफस्टाइलचे राजेश आणि दिलीप वर्धन यांच्याविरोधात

Filed Under Cheating Builder | फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल

Next

मुंबई : गिरगाव येथील भद्रन हाउस पुनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याच्या आरोपावरून विकासक वर्धमान लाइफस्टाइलचे राजेश आणि दिलीप वर्धन यांच्याविरोधात व्ही.पी. रोड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या इमारतीच्या पुनर्विकासानंतर वर्धन बंधूंनी ८0 चौ. फूट अतिरिक्त जागा देण्याचा करार आपल्यासोबत करून त्यासाठी ८ लाख ८२ हजार रुपये घेतले होते. प्रत्यक्षात इमारतीचे काम पूर्ण झाले तेव्हा आपल्याला सोसायटीच्या पोस्टल बॉक्ससाठी ठेवलेल्या जागेत तयार करण्यात आलेला अनधिकृत गाळा बिल्डरकडून देऊ करण्यात आला. मात्र सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास आक्षेप घेतल्याने बिल्डरला हा डाव अयशस्वी झाल्याचे तक्रारदार भवरलाल जैन यांनी सांगितले.
या फसवणुकीमुळे जैन यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे वर्धन बंधू यांनी करारपत्रक कायदेशीर नोंदणी केलेले नाही. कराराच्यावेळी पुनर्विकासाबाबतचा नकाशा दाखवला नाही. तसेच कराराप्रमाणे ३0 महिन्यांच्या आत जागा दिली नाही, अशी तक्रार केली. कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून बिल्डरविरोधात भादंवि कलम ४२0, ३४ आणि मोफाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्ह्याचे स्वरूप पाहता या एफआयआरमध्ये कलम ४६७ आणि ४७१चाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Filed Under Cheating Builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.