मुंबई : एका उच्चभ्रू सोसायटीच्या पार्किंगमध्ये मृत भ्रूण सापडल्याने खळबळ उडाली आहे. मालाडच्या कुरार परिसरात हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे.मालाडच्या अल्टा मोन्टे टॉवरमध्ये हा प्रकार घडला. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास या सोसायटीतील स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत होती. त्या वेळी तिला वरून काहीतरी फेकल्याचा आवाज आला. डायपरची पिशवी फेकली असावी, असे तिलावाटले. मात्र, पार्किंग परिसर झाडत झाडत पुढे गेली असता तिला एक काळी पिशवी दिसली. त्याच्या आसपास रक्ताचे शिंतोडे पसरल्याचे तिने पाहिले. तेव्हा तिने आरडाओरड करत या प्रकरणी सुरक्षारक्षकांना सांगितले. त्यांनी सोसायटीतील अध्यक्षांना याबाबत कळविल्यानंतर कुरार पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, ते भ्रूण ताब्यात घेत रुग्णालयात पाठविले. ते मृत असून, चार ते पाच महिन्यांचे पुरुष जातीचे असल्याचे डॉक्टरने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी ते शवविच्छेदन अहवालासाठी पाठविले.या प्रकरणी अनोळखी मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहत आहोत, जेणेकरून भ्रूणाला फेकणाºयाबाबत माहिती मिळू शकेल, अशी माहिती कुरार पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयकुमार राजेशिर्के यांनी दिली.प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणी स्थानिकांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे तपास अधिकाºयाचे म्हणणेआहे. मात्र, अद्याप पोलिसांनाया प्रकरणी कोणताही ‘क्लू’ मिळालेला नसल्याचेही राजेशिर्केयांनी सांगितले.
मालाडमधील उच्चभ्रू सोसायटीच्या पार्किंगमध्ये सापडले मृत भ्रूण, अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 2:13 AM