महापालिकेमधील फायलींना फुटले पाय
By Admin | Published: August 1, 2014 03:46 AM2014-08-01T03:46:38+5:302014-08-01T03:46:38+5:30
महापालिकेमध्ये विकासकामांच्या फायली हरविण्याचे प्रमाण वाढले आहे. विकासकामांची एक फाईल चक्क उड्डाणपुलाखाली आढळून आली आहे.
नवी मुंबई : महापालिकेमध्ये विकासकामांच्या फायली हरविण्याचे प्रमाण वाढले आहे. विकासकामांची एक फाईल चक्क उड्डाणपुलाखाली आढळून आली आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सुरज पाटील यांची त्यांच्या प्रभागामधील उद्यानाची फाईल दोन वेळा गहाळ झाली. अशा प्रकारे फाईल गहाळ करणाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला. अशा प्रकारे कारभार सुरू असेल तर त्याला जबाबदार कोण, अशी विचारणाही त्यांनी केली. पालिकेमधून फायली हरवत असल्याबद्दल एम. के. मढवी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विनया मढवी यांच्या प्रभागातील २०१२ मधील विकासकामांची एक फाईल पालिकेत सापडली नाही. खूप प्रयत्न केल्यानंतरही काहीही हाती लागले नाही. अखेर ही फाईल महापेच्या पुलाखाली पडली असल्याचे निदर्शनास आणून दिले.
फायली हरविण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अनंत सुतार यांनी केली.
शहर अभियंता मोहन डगावकर व मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सांगितले की, असे प्रकार होऊ नयेत यासाठी पालिकेमधील फायली येथील शिपाई,कर्मचारी व अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही हाती दिली जाऊ नये. असे केले तरच या प्रकारांना आळा बसेल असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)