नीरव मोदीविरुद्ध ईडीचे पुरवणी आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:04 AM2019-03-13T02:04:02+5:302019-03-13T02:04:20+5:30

महागड्या चित्रांचाही होणार लिलाव

Filing charge sheet against Nitish Modi | नीरव मोदीविरुद्ध ईडीचे पुरवणी आरोपपत्र दाखल

नीरव मोदीविरुद्ध ईडीचे पुरवणी आरोपपत्र दाखल

Next

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरुद्ध विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या येथील न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच त्याच्याकडील महागड्या चित्रांचाही लिलाव करण्याच्या दृष्टीने कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

नीरव गेल्यावर्षी पंजाब नॅशनल बँकेला १३,७०० हजार कोटी रूपयांना फसवून विदेशात पळून गेला. ईडीच्या या आरोपपत्रात नीरवची पत्नी अ‍ॅमी हिच्यासह इतरही काहींची आरोपी म्हणून नावे आहेत. लेटर आॅफ अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेकडून फसवणुकीतून घेतलेल्या पैशांतून केलेल्या हवाला व्यवहारात अ‍ॅमी मोदी हिचा सहभाग असल्याचा आरोप तिच्यावर आहे. ताज्या आरोपपत्रानुसार मोदी याने फसवणुकीतून मिळवलेले ९३४ कोटी रूपये स्वत:च्या वैयक्तीक खात्यात तसेच त्याच्या कुटुंबातील इतर दोघांच्या नावे दोन खात्यांत वळवले.

दुबई, संयुक्त अरब अमिरात आणि सिंगापूरस्थित कंपन्यांच्या बँक खात्यांचा तपशील ईडीने पैशांचा माग सिद्ध करण्यासाठी आपल्या ताज्या आरोपपत्रात दिला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, ईडीने फसवणुकीच्या पैशांचा ९१ टक्के प्रवाह उघडकीस आणला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५६० कोटी रूपये मोदीच्या खात्यात जमा झाले तर २०० कोटी रूपये त्याच्या पत्नीच्या खात्यात आणि १७४ कोटी रुपये त्याचे वडील दीपक मोदी यांच्या वैयक्तीक बँक खात्यात भरण्यात आले. ही सगळी बँक खाती परदेशांत आहेत.

खात्यात वळवल्या रकमा
पंजाब नॅशनल बँकेतून बनावट कंपन्यांच्या बँक खात्यात पैसे मिळाल्यानंतर त्यातील काही भाग हा नीरव मोदीचे नियंत्रण असलेल्या पॅसिफिक डायमंडसला मिळायच्या आधी वेगवेगळ््या छोट्या कंपन्यांकडे वळवण्यात आला होता. या कंपनीच्या बँकेच्या स्टेटमेंटनुसार मोदी व त्याच्या वडिलांच्या खात्यांत मोठ्या रक्कमा पाठवण्यात आल्याचे दिसते.

Web Title: Filing charge sheet against Nitish Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.