निकालाचे काम करायचे की माहिती भरायची? शिक्षकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:11 AM2018-04-16T07:11:05+5:302018-04-16T07:11:05+5:30
सध्या शाळांमधील शिक्षकांना पेपर तपासणी, निकालांच्या कामांसोबतच दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही घ्यावे लागत आहे. त्यातच समग्र शिक्षा अभियान योजनेसाठी २५ एप्रिलपर्यंत आॅनलाइन माहिती भरून देण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे.
मुंबई - सध्या शाळांमधील शिक्षकांना पेपर तपासणी, निकालांच्या कामांसोबतच दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणही घ्यावे लागत आहे. त्यातच समग्र शिक्षा अभियान योजनेसाठी २५ एप्रिलपर्यंत आॅनलाइन माहिती भरून देण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे निकालाची कामे करायची की आॅनलाइन माहिती भरायची, असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. हे आदेश तातडीने मागे न घेतल्यास कामांवर बहिष्कार टाकू, असा इशाराही शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण सचिवांना पत्राद्वारे दिला आहे.
सध्या शाळांमध्ये परीक्षा संपल्या असून, आता पेपर तपासणी व निकालाची कामे सुरू आहेत. इयत्ता दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे सर्व विषयांचे प्रशिक्षण सुरू असून, २० एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. त्यातच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आदेश काढून स्टुडंट डेटाबेस मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सीस्टिम या प्रणालीत इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांची अद्ययावत माहिती भरून देण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व माहिती राज्य शासनाला केंद्राला देणे बंधनकारक असून, ही माहिती १ मेच्या आत देण्याची मुदत आहे. त्यामुळेच शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती २५ एप्रिलपर्यंत भरून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
मात्र, आधीच निकालाचे काम, त्यातच प्रशिक्षण आणि आता हे काम करायचे असल्याने शिक्षकांवरील तणाव वाढला आहे. हे आदेश मागे घेण्यात यावेत. कारण शिक्षकांचे काम फक्त अध्यापनाचे असून, त्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही प्रकारची अशैक्षणिक कामे देऊ नयेत, अशी मागणी मुंबई विभागातील शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात केली आहे, अन्यथा शिक्षक आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
काय आहेत आदेश?
च्महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आदेश काढून स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सीस्टिम या प्रणालीत इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांची अद्ययावत माहिती भरून देण्याचे आदेश दिले आहेत.
च्आतापर्यंत राज्यात सरलची जी माहिती भरण्यात आली आहे, ती सर्व माहिती एसडीएमआयएस प्रणालीला जोडली आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त ज्या माहितीची नव्याने गरज आहे, ती माहिती शिक्षण विभागाने आॅनलाइन भरायची आहे.
शाळांना पाच दिवसांचा आठवडा सक्तीचा करा
च्मुलांचे शाळा, क्लास, होमवर्क, तसेच पालकांच्या वाढत्या अपेक्ष्यांच्या ओझ्याखाली बालपणच हरवत चालले असून, मैदानी खेळ, विविध छंद जोपासण्यापासून मुले दूर जात आहे. विद्यार्थ्यांचे हे हरवलेले बालपण पुन्हा शोधून देण्याची गरज असून, त्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे.
च्यासाठी मुंबईसह राज्यातील सर्व शाळांना पाच दिवसाचा आठवडा सक्तीचा करण्याची मागणी, शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
च्याबाबत शुक्रवारी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण आयुक्त, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक यांना पत्र लिहिले असून, त्यात ही मागणी करण्यात आली आहे.