खाडीच्या बांधकामासाठी कांदळवनाचा भराव

By admin | Published: September 10, 2014 11:34 PM2014-09-10T23:34:08+5:302014-09-10T23:34:08+5:30

खाडीला येणा-या भरतीचे पाणी गावात शिरू नये, यासाठी खाडी किनारी बांधकाम करण्यात येते. त्याला खांड किंवा संरक्षण कठडा असेही म्हटले जाते.

Filling of the canal for the construction of the creek | खाडीच्या बांधकामासाठी कांदळवनाचा भराव

खाडीच्या बांधकामासाठी कांदळवनाचा भराव

Next

राजू भिसे, नागोठणे
खाडीला येणा-या भरतीचे पाणी गावात शिरू नये, यासाठी खाडी किनारी बांधकाम करण्यात येते. त्याला खांड किंवा संरक्षण कठडा असेही म्हटले जाते. मात्र परिसरातील खारभूमी विभागामार्फत नियुक्त बांधकाम ठेकेदाराने परिसरातील कांदळवन तोडून खांडीत भराव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या विरोधात धाकटे शहापूर येथील रजनीकांत पाटील, मितेश पाटील, अरविंद पाटील, रामेश्वर पाटील, रवींद्र पाटील आदी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
धरमतर शहापूर-धेरंडजवळील उपखाडीच्या धाकटे शहापूरजवळच्या भंगारकोठ्यातील उघाडीचे पाणी जाण्याचा पूर्वीचा नैसर्गिक मार्ग बंद होवून खाडीतील मुख्य प्रवाहाच्या बाजूला भगदाड पडल्यामुळे भरती सुरु झाल्यानंतर हे पाणी फुटलेल्या खांडीमार्गे शेतात किंवा खलाटीत घुसते.
शंभर वर्षांपासून असलेल्या या ठिकाणच्या उघाडीवर भरतीच्या पाण्याचा दाब पडतो, आणि ओहोटीच्यावेळी बांध खचत जातो अशी या खाडीची वस्तुस्थिती आहे. नोव्हेंबर २०११ ला मोठ्या उधाणाला येथे पहिली खांड पडली असता गावकऱ्यांनी श्रमदानाने ती बांधली होती. परंतु मार्च-एप्रिल २०१२ दरम्यान ती पुन्हा पडली गेली होती. या खाडी व गावांच्या दरम्यानची जागा टाटा कंपनीने विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी खरेदी केली असल्याने शहापूरचे तत्कालीन सरपंच महेंद्र पाटील यांनी त्यावेळी पडलेल्या खांडीची दखल घेतली व टाटा पॉवर कंपनीला पत्र लिहून त्यांच्या निदर्शनास आणल्याने कंपनीला या गंभीर बाबीची दखल घ्यावी लागली होती.
खांडीचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित असताना टाटाने १३ लाख रु पयांची रक्कम खारभूमी विभाग, पेण यांच्याकडे वर्ग केली होती. काम सुरु झाल्यानंतर तेथील कांदळवन तोडून ते भर म्हणून याच बांधकामात टाकले असल्याचे उघडकीस आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. खांड बांधल्यानंतर ती चार ते पाच महिनेच अस्तित्वात राहते. खाडीतून येणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे गडगा न टाकल्यामुळे तसेच उघाडीतून येणाऱ्या पाण्यासाठी जुनी खोची पूर्ववत न केल्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद होतो. कृत्रिम प्रवाह तयार होवून कोठ्याला व बांधकामाला भगदाड पडत असते असे त्यांचे म्हणणे आहे.
मुळात कांदळवन तोडून बांधकाम करताना तेथे त्यावेळी खारभूमी खात्याचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित का राहिला नाही,असा त्यांचा सवाल आहे. कांदळवनाची जपणूक करणे व त्याची निगा राखून होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे याबाबत शासनाचा निर्बंध असताना येथील कांदळवन कोणत्या आदेशाने तोडले गेले अशी त्यांची विचारणा आहे.

Web Title: Filling of the canal for the construction of the creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.