राज्यात फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार; हे ३६५ दिवस सुरु राहणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 05:46 PM2023-02-22T17:46:07+5:302023-02-22T17:46:28+5:30

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

Film Bazaar portal will be created in the state; Information by Minister Sudhir Mungantiwar | राज्यात फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार; हे ३६५ दिवस सुरु राहणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्यात फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार; हे ३६५ दिवस सुरु राहणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

googlenewsNext

मुंबई: राज्यात मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रम यांचा विकास ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल 24/7 आणि 365 दिवस सुरु राहिल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष असतील. तर स्वप्नील जोशी, संदिप घुगे, केतन मारु या समितीमध्ये सदस्य असतील. मराठी चित्रपट, दूरदर्शनवरील विविध चॅनलच्या मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार इत्यादींना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी समन्वय साधणे, त्यांना नियमितपणे सल्ला देणे आणि बिगर आर्थिक सहाय इत्यादी बाबीसाठी याची मदत होणार आहे.

राज्यातील स्वातंत्र्यसेनानी, इतर महत्वाचे समाजसुधारक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती इत्यादींच्या जीवनावर आधारी चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब मालिका इत्यादी निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे काम ही नियुक्त समिती करणार आहे. मराठी निर्मात्यांना आर्थिक नुकसान झालयास त्यांनी सदर व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बँकांकडून कमीत कमी दरात हमी मिळेला का याबाबत ही अभ्यास करणे. भौतिकरित्या होणाऱ्या फिल्मबाजार पध्दतीचा अभ्यास करुन ऑनलाईन पोर्टल तयार करण्याबाबतचा आराखडा शासनास सादर करणे, तसेच आवश्यकतेप्रमाणे मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती/ संस्था यांच्याशी समन्वय करणे हे काम सदर समिती करेल. याशिवाय पोर्टल तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विकासक यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधण्याचे काम करेल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

Web Title: Film Bazaar portal will be created in the state; Information by Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.