Join us

मोबाईल चोराचा ‘फिल्मी स्टाईल’ने पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 7:07 AM

वांद्रे परिसरात एकाचा मोबाईल हिसकावून पळणाºया चोराला वरळी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाºयांनी ‘फिल्मी स्टाईल’ ने पाठलाग करत पकडले.

मुंबई: वांद्रे परिसरात एकाचा मोबाईल हिसकावून पळणाºया चोराला वरळी पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाºयांनी ‘फिल्मी स्टाईल’ ने पाठलाग करत पकडले. जवळपास वीस मिनिटे सुरु असलेल्या या ‘पिछा करो’ मध्ये एक कर्मचारी किरकोळ जखमीही झाला. मात्र त्याने त्या चोराला बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन केले.बुधवारी रात्री वरळी पोलीस ठाण्याचे व्हॅन चालक दीपक रामचंद्र भोसले (३१) आणि आॅपरेटर किरण काशीद हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन देसुरकर यांना घरी सोडून कलानगर परिसरातून पोलीस ठाण्यात परतत होते. त्याचवेळी भारतनगर झोपडपट्टीजवळ एक मुलगा चोर चोर असे ओरडत दुसºया मुलाच्या मागे धावत असल्याचे त्यांनी पाहिले. तो चोर गाडीच्या दिशेनेच येत असल्याने भोसले आणि काशीद यांनी त्या चोराला पकडण्याचे ठरविले. त्यानुसार काशीद हे खाली उतरले. मात्र चोर त्या आधीच पुढे उभ्या असलेल्या रिक्षात बसला आणि चालकाने रिक्षा पळविण्यास सुरुवात केली. मधल्या एका निमुळत्या रस्त्याजवळ रिक्षा येताच त्यातील तीन जण खाली उतरले. काशीद हे त्यांच्या मागावरच असल्याने त्यातील एक जण पोलिसांच्या हाती लागला. ज्याचे नाव कुणाल शंकर खोंडे (१९) असून रिक्षाचालक आणि त्याचे अन्य दोन साथीदार असे तिघे घटनास्थळावरुन फरार झाले. मुख्य म्हणजे रिक्षाचा पाठलाग करतात चालकाने उलट्या दिशेने रिक्षा आणल्याने त्याची धडक काशीद यांना बसली. मात्र त्यांनी खोंडेला सोडले नाही. या दरम्यान भोसले देखील त्यांच्या मागे होतेच. काशीद यांनी कलानगर जंक्शनजवळ पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करुन मदत मागितली. त्यानुसार बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोंडेला अटक केली. त्याच्याकडे त्याच्या अन्य फरार साथीदारांची चौकशी सुरु असून लवकरच त्यांच्याही मुसक्या पोलीस आवळतील. याप्रकरणी खोंडे याला अटक केली आहे. तर त्याचे अन्य तीन साथीदार मात्र फरार झाले असुन त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती बीकेसी पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

टॅग्स :गुन्हामुंबई