Join us

फिल्मसिटीच्या सुरक्षेत केली वाढ

By admin | Published: August 03, 2015 1:37 AM

गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी परिसरात पोलिसांनी सुरक्षा अधिक वाढवली आहे. यासंदर्भात नुकतीच फिल्मसिटी व्यवस्थापनासोबत पोलिसांची

बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्थेच्या प्रेमलता सोनुने यांच्या पुढाकारातून महिलांनी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी अनेक महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत आमदार नीलम गोर्‍हे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी याप्रकरणी अधिकार्‍यांची बैठक घेऊन दारूबंदीसंबंधी आढावा घेण्यात येईल तसेच दारूमुक्तीसाठी लढणार्‍या महिला कार्यकर्त्यांंवरील गुन्हे मागे घेण्याबाबत खास लक्ष घालू, असे आश्‍वासन दिले. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात वैध आणि अवैध दारूवर कायमस्वरूपी बंद घालण्यात यावी, या मागणीकरिता अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने २२ जुलै २0१५ रोजी पुकारण्यात आलेला एल्गार महिला संघटनेतर्फे लाखो नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यामध्ये देशी दारूची दुकाने, वाईन बार, बीअर शॉपी याशिवाय अवैध दारूविक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. दारूमुळे तरुण पिढीसह अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत चालले असून या दारूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली, त्या प्रमाणे बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, या मागणीसाठी असंख्य महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसल्या होत्या. याबाबत संतापलेल्या महिलांनी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेले निवेदन, अनेकवेळा मोर्चे, आंदोलन केले. त्यामुळे काही महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.