चित्रपट निर्मात्याला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:30 AM2019-05-29T02:30:53+5:302019-05-29T02:30:56+5:30

नामांकित चित्रपट निर्माता आणि त्याच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

The filmmaker threatens to kill him | चित्रपट निर्मात्याला जीवे मारण्याची धमकी

चित्रपट निर्मात्याला जीवे मारण्याची धमकी

Next

मुंबई: नामांकित चित्रपट निर्माता आणि त्याच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार चित्रपट दिग्दर्शकासह तिघांच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने आवळल्या आहेत़ त्यांची चौकशी सुरू आहे.
अंडरवर्ल्डच्या नावाने खंडणी मागणाऱ्या रोहन रेडकर (२७), शशांक सुमण अरुणेशकुमार वर्मा (३३) आणि भुपेशकुमार कृष्णमोहन प्रसाद (३६) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तक्रारदार चित्रपट निर्मात्याने २५ मे, २०१९ रोजी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अंडरवर्ल्डमधुन बोलत असून आम्हाला २५ लाख रुपये दे, नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारू, अशा आशयाची धमकी काही इसम इंटरनेट कॉल करुन देत असल्याचे निर्मात्याने बांगुरनगर पोलिसांना सांगितले. त्यानुसार बांगुरनगर पोलिसांनी अनोळखी इसमाविरोधात खंडणी तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ चे प्रमुख चिमाजी आढाव आणि त्यांचे पथकही चौकशी करत होते. निर्मात्याला इंटरनेट कॉल करणारा इसम प्रसाद असुन तो गोराईत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली.
त्यानुसार आढाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रईस शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झीने आणि पथकाने गोराई परिसरात सापळा रचला. प्रसादच्या मुसक्या आवळत त्याची चौकशी करून वमार्चा मालाड पश्चिम
येथील एव्हरशाईननगर तर रेडेकरचा मनोरी गावातून गाशा गुंडाळण्यात आला.
>डीपीवर ‘छोटा राजन’चा फोटो !
मुख्य आरोपी प्रसाद याने निर्मात्याला इंटरनेट कॉल ज्या आयडीवरून केला, त्यावर अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजन याचा फोटो होता. चित्रपट दिग्दर्शक असलेला प्रसाद हा निर्मात्यासोबत काम करत होता. पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाजले आणि त्याने याचा बदला घेण्याचे ठरवत कट रचला. वर्मा हा कॅमेरामन तर रेडेकर हा बेरोजगार आहे. प्रसादने या दोघांनाही स्वत:सोबत सामील करून घेतले होते.
>मोबाइलमध्ये सापडला पुरावा
प्रसाद याने त्याच्या मोबाईलचा वापर करत तक्रारदाराला धमकावले होते. आढाव यांच्या पथकाने तो मोबाईल प्रसादकडून हस्तगत केला आहे. त्यावरून त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला असल्याचे तपास अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

Web Title: The filmmaker threatens to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.